AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला सर्वात मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांची उडाली झोप, थेट अमेरिकन…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला आहे. भयंकर हल्ले केली जात आहेत. दुबई इराणच्या निशाण्यावर आहे. दुबईतील अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ले केले जात आहेत. इराणने आपली ताकद दाखवणारा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. ज्याने जगाची झोप उडाली.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला सर्वात मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांची उडाली झोप, थेट अमेरिकन...
Attack on the American Embassy in Dubai
| Updated on: Mar 04, 2026 | 10:09 AM
Share

अमेरिका इराणविरोधात थेट मैदानात उतरली आहे. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष पेटला. मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिका थेट या युद्धात उतरल्याने युद्ध अधिक घातक होताना दिसत आहे. अमेरिकेचे फायटर जेट मोठे हल्ले करत आहेत. इराणच्या कमांडर सेंटरवर भीषण हल्ला करण्यात आला. इराणमधील शाळेवर घातक हल्ला केला, ज्यात 170 मुलींचा जीव गेला. शाळांना टार्गेट केले जात आहे. कच्चा तेलाचा आयात आणि निर्यात दोन्ही जवळपास थांबले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांमध्ये हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने 14 देशांची एक यादी प्रसिद्ध करत आपल्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये  साैदी अरेबिया, कतार, कुवेत, इस्त्रायल, इराण, इराक, सीरिया यासारखे देश पुढील काही तासात सोडण्यास सांगितले आहेत. यामुळे अमेरिकेच्या डोक्यात काहीतरी भयंकर असल्याचे स्पष्ट होतंय. इराणकडूनही थेट अमेरिकेच्या दूतावास कार्यालयांना टार्गेट केले जात आहे .

यादरम्यानच आता इराणने अमेरिकेला मोठा दणका दिला. इराणकडून दुबईतील तब्बल 2 अमेरिकन दूतावास कार्यालयांना टार्गेट करत मोठा हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दूतावासाला आग लागली. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असल्याचेही सांगितले जात आहे. अनेक देशात सध्याच्या घडीला अमेरिकन दूतावाला टार्गेट केले जात आहे.

त्यामध्येच दुबईत अमेरिकन दूतावासावर थेट ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली. दुबईत फक्त अमेरिकन दूतावासच नाही तर विविध भागात हल्ले केले जात आहेत. लोकांना पूर्वी दुबई अत्यंत सुरक्षित वाटत. मात्र, ज्यापद्धतीने सध्या दुबईमध्ये स्थिती आहे ती अत्यंत गंभीर आणि बिकट आहे.

दुबई विमानतळावरही हल्ला करण्यात आला. अनेक लोक दुबईमध्ये अडकून पडले आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देखील दिल्या जात आहेत. आता इराणने केलेल्या दूतावासावरील हल्ल्या बदला अमेरिका नक्की कसा घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हे युद्ध पेटताना दिसत असून या युद्धात अनेक देश हे भरडले जात असल्याचेही बघायला मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...