AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या LPG पुरवठ्यावर मोठं संकट, इराण अमेरिका युद्धाची थेट झळ, फक्त इतक्या दिवसाचाच गॅस…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले असून पुढील काही दिवस युद्ध सुरू राहणार आहे. मात्र, या युद्धादरम्यान भारताच्या समस्यांमध्येही मोठी वाढ झाली. एलपीजी गॅसची समस्या भारतापुढे आले. याबाबत भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

भारताच्या LPG पुरवठ्यावर मोठं संकट, इराण अमेरिका युद्धाची थेट झळ, फक्त इतक्या दिवसाचाच गॅस...
LPG gas
| Updated on: Mar 04, 2026 | 9:26 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. मात्र, या युद्धाचा फटका अनेक देशांना थेटपणे बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. यासोबतच इराणने मोठा निर्णय घेत महत्वपूर्ण सागरी मार्ग बंद केल्याने टँकर येण्याची संख्या कमी आहे. स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टँकर 80 टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच जल मार्गावर हजारो टँकरचा मोठा जाम लागला आहे. स्टेट ऑफ होर्मुज मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. यासोबतच येथे टँकर दिसले तर आम्ही आग लावू अशी धमकीही इराणकडून देण्यात आली, ज्यामुळे अनेक देश कोंडीत सापडली आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या, एलपीजी आणि एलएनजी गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. यासोबतच भारत देखील तणावात आहे.

कारण सध्याच्या स्थितीला भारतात होणारी ऊर्जेची आयात जवळपास बंद झाली. भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, भारताकडे भरपूर सध्या स्टॉक आहे. पुढील 25 दिवस चालेल इतका साठा भारताकडे डिझेल आणि पेट्रोलचा आहे. भारताकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, भारत सध्या इतर पर्यायी गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे. युद्ध जास्त काळ सुरू राहिले तर स्वयंपाक घरात लागणार एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

ज्याचा परिणाम थेट लोकांच्या घरापर्यंत होईल. तेल कंपन्यांनी यूनिटसोबत एलपीजी गॅसचे उत्पादन वाढवण्यास सुरूवात केली. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, सध्याच्या परिस्थितीला कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीची कोणतीही समस्या नाही. मात्र, असे असले तरीही देशात मोठ्या संख्येने दररोज ऊर्जा लागते, त्याची आयात अत्यंत महत्वाची आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या घडीला जरी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत असल्या तरीही त्याचा कोणताही परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार नाही. डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती स्थिर राहतील. मुळात म्हणजे सध्याच्या घडीला भारताची चिंता डिझेल, पेट्रोल नाहीच, एलपीजी गॅस ही चिंता आहे. कारण भारतात 80 टक्के एलपीजी गॅस होर्मुजहून भारतात येते आणि तोच मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. यासोबतच भारताकडे एलपीजी गॅसचे कोणताही पर्याय नाही. आपल्या देशात 60 टक्के एलपीजी गॅस आयात केला जातो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...