AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 8 वाजता सर्व उद्ध्वस्त होणार, इराणचे नागरिकांना मोठे आवाहन, थेट मानवी..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. मात्र, आता विनाशाला सुरूवात होणार असल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या धमकीचा वेळ संपत आहे. घातक हल्ले केले जाऊ शकतात. यादरम्यानच मोठी बातमी पुढे येत आहे.

रात्री 8 वाजता सर्व उद्ध्वस्त होणार, इराणचे नागरिकांना मोठे आवाहन, थेट मानवी..
iran sports minister
| Updated on: Apr 07, 2026 | 9:59 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर मंगळवारी रात्री 8 वाजता मोठा हल्ला केला जाईल म्हटले. इराणला पाषाण युगात पाठवायचे असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतीय वेळेनुसार, बुधवारी 3.30 वाजता अमेरिका इराणवर घातक हल्ला करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्याकरिता इराणला 48 तासाचा वेळ दिला. तो वेळ मंगळवारी रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यानंतर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जाणार आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या धमकीनंतरही इराण माघार घेत नाही. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव उलटून टाकण्यासाठी इराणकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. इराण सरकारकडून आपल्या जनतेला मोठे आवाहन करण्यात आले. इराण सरकारने आपल्या देशातील युवकांना ऊर्जा प्रकल्पांभोवती मानवी साखळी करून उभे राहण्याचे आवाहन केले.

ऊर्जा प्रकल्पांच्या चारही बाजूने मानवी साखळी तयार करून उभे राहा, असे म्हटले. इराणच्या क्रिडा मंत्रालयाने खेळाडू, कलाकार आणि विद्यार्थ्यांना मोठे आवाहन केले. क्रीडा मंत्रालयाने म्हटले की, मंगळवारी दुपारी 2 वाजता सर्वांनी ऊर्जा प्रकल्पांजवळ जमावे. यावेळी खेळाडू, कलाकार आणि देशातील तरूण निषेध देखील करतील. मानवी साखळी तयार करून त्यांच्याकडून आपल्या देशाच्या ऊर्जा प्रकल्पांचे संरक्षण केले जाईल.

अमेरिकेकडून इराणमधील ब्रिज आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली. मात्र, तरीही इराण मागे हटत नाही. करार स्विकारण्यापेक्षा इराणकडून प्लॅन बी तयार करण्यात आला. म्हणजेच थोडक्यात काय तर अमेरिकेच्या धमकीनंतरही इराण होर्मुज खाडी खुली करणार नाही किंवा करारही करणार नाही. युद्ध थांबवण्याकरिता इराणच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर आम्ही मागे हटणार नाहीत, ही त्यांची भूमिका आहे. तेहरान रात्री 8 वाजता आत्मसर्मपण करणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची भूमिका आहे. या युद्धात जग होरपळत आहे. जर युद्ध भडकले तर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होईल. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेशिवाय जगातील सर्वच देश युद्धातून बाजूला आहेत. मात्र, परिणाम तर सर्वांनाच भोगावे लागत आहेत.

Follow Us
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा