
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं. या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवर मिसाइल हल्ला झाला. अमेरिकेनेच शाळेवर हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकन सैन्याच्या तपासातून हा खुलासा झाला आहे. मिनाबमध्ये शाळेवर झालेल्या मिसाइल हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार आहे हे अमेरिकन सैन्याच्या चौकशीतून समोर आलय. न्यू यॉर्क टाइम्सने हे वृत्त दिलय. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला. टार्गेट निवडण्यातील चुकीमुळे हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. यूएस सेंट्रल कमांडच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याचे टार्गेट कोऑर्डिनेट्स बनवण्यासाठी डिफेंस इंटेलिजेंट एजन्सीकडून मिळालेल्या जुन्या डेटाचा वापर केला हे प्राथमिक चौकशीतून समोर आलय.
अमेरिकेने टॉमहॉक मिसाइलने मिनाब शहरातील शाजराह तैयबेह एलिमेंट्री शाळेवर हल्ला केल्याचं NYT च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ही शाळा इराणच्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या (IRGC) एका नेवल बेस जवळ होती. ही माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलीय. जुना डेटा पुन्हा का चेक केला नाही? असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत.
AI ने चूक कशी काय केली?
इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात अमेरिका AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. AI च्या मदतीने फक्त 24 तासात इराणमध्ये 1,000 टार्गेट्सवर निशाणा साधण्यात आला. Advance AI सिस्टिममुळे ही चूक झालेली असू शकते अशी चर्चा आहे. अमेरिकन सैन्य एंथ्रोपिकच्या AI मॉडल क्लाउडचा वापर करते. वॉर टेक कंपनीने Palantir सोबत मिळून याचा वापर केला. द वॉशिंगटन पोस्ट आणि द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, क्लाउड Palantir मेवेन स्मार्ट सिस्टममध्ये बसवण्यात आलं आहे. अमेरिकन सैन्याला या द्वारे टार्गेटच्या अचूक लोकेशनची माहिती मिळते. शाळेची जागा बदलणं AI टूलच्या लक्षात आलं नसेल असं सुरुवातीच्या चौकशीतून समोर आलय.
ट्रम्प खोटे ठरले
या रिपोर्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प खोटे ठरले आहेत. इराणने स्वत: या शाळेवर बॉम्बफेक केली असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे की, त्यांच्या सैन्याने सिविलियन इंफ्रास्ट्रक्चरवर हल्ला केलेला नाही, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
इराणने काय म्हटलय?
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी X वर शाळेवर झालेल्या हल्ल्याचं व्हिडिओ फुटेज पोस्ट केलय. अमेरिकेवर युद्ध गुन्ह्याचा गंभीर आरोप केलाय. अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाइलमुळे 28 फेब्रुवारीला मिनाब शहरात 168 छोटे निरागस जीव आपल्या प्राणाला मुकले. हा असा गुन्हा आहे, ज्याला माफ केलं जाऊ शकत नाही असं बाघेई यांनी लिहिलं आहे.