AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Oil Update : स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक जहाज निघत नसताना भारताचा मास्टर स्ट्रोक, तेल संकटात एक मोठी GOOD NEWS

India Oil Update : इराणच्या हल्ल्याच्या भितीमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक जहाजं निघणं मुश्किल बनलय. अशा कठीण काळात भारताने एका मास्टर स्ट्रोक मारलाय. युद्धाची झळ भारताला मोठ्या प्रमाणात बसत असताना भारतीयांच्या यामुळे चिंता कमी होतील.

India Oil Update : स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक जहाज निघत नसताना भारताचा मास्टर स्ट्रोक, तेल संकटात एक मोठी GOOD NEWS
Indian Oil
| Updated on: Mar 11, 2026 | 4:02 PM
Share

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. कारण इराणने आपल्या बचावाच्या रणनितीसाठी आखाती देशांमधील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे भारताचे मुख्य ऊर्जा पुरवठादार असलेल्या देशांच्या काही रिफायनरीज बंद आहेत. त्याशिवाय इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतून करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येत आहे. या दोन कारणांमुळे पुढच्या काही दिवसात तेल आणि LPG गॅसचं संकट अधिक गंभीर होण्याचा धोका आहे. भारताचं तेल आणि LPG दोन्ही मोठ्या प्रमाणात स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतं. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून 30 दिवस तेल विकत घेण्याची परवानगी दिली आहे.

त्यानुसार भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु केल्याची माहिती आहे. भारताने रशियाकडू 30 मिलियन बॅरल तेल विकत घेतलं आहे. म्हणजे 3 कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिलीय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. ऊर्जा संकटाची चाहूल लागताच भारतीय तेल कंपन्यांनी आशियाई समुद्रात उभ्या असलेल्या कार्गोकडून लगेच तेल खरेदी सुरु केली. रशियाकडून सवलतीच्या दरात तेल मिळत असल्याने भारताने मागच्या काही महिन्यात रशियाकडून रेकॉर्ड तेल खरेदी केली आहे. भारताच्या तेल खरेदीमुळे रशियाला युक्रेन विरुद्ध युद्ध लढण्यासाठी बळ मिळतं. त्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता.

त्यानंतर हा टॅरिफ मागे घेण्यात आला

काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिकेमध्ये ट्रेड झाली. त्यानंतर हा टॅरिफ मागे घेण्यात आला. त्यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी करायची नाही असं ठरल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येतं. भारताने मात्र आपण रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं कुठेही म्हटलं नाही. उलट अमेरिकाच स्वत:चे दावे स्वत: करत होती. आता इराण विरुद्ध युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने बंद केल्यामुळे भारताची तेल आणि LPG गॅसची आयात थांबली आहे. जगातील 20 टक्के कच्चा तेलाची वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होते. भारताचं जवळपास 40 टक्के कच्चं तेल याच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच