AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसमाप्तीसाठी चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता इराणने थेट मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारतालाही काही प्रमाणात फायदा होणार आहे.

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर...
strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2026 | 5:35 PM
Share

Strait Of Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या दोन्ही दशांत समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका पार पडत आहे. लवकरच दोन्ही देशांत युद्धबंदीचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. हे युद्ध संपल्यानंतर लवकरच इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार आहे. करारानंतर साधारण तीस दिवसांत परिस्थिती पूर्ववत करण्यात येईल असे सांगितले जाते. दरम्यान, हा करार अस्तित्त्वात येण्याआधीच इराणने जगाला एक मोठी खुशखबर दिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणने ही माहिती दिली आहे.

इराणने केली मोठी घोषणा

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी 25 मे रोजी एक पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील व्यवस्थापनाबाबत माहिती दिली आहे. या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा किनारपट्टीवरील देशांकडे आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल वसूल करणार नाही. परंतु या सामुद्रधुनीत ज्या सेवा दिल्या जातील, त्या बदल्यात आम्ही सेवाशुल्क घेऊ असे बाघेई यांनी सांगितले.

याआधी इराणने एक प्राधिकरण स्थापन करून व्यापारी जहाजांकडून टोल वसूल केला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु आता हा टोल आम्ही वसूल करणार नाही,असे बाघेई यांनी सांगितले आहे. आम्ही देत असलेल्या सेवांच्या बदल्यात काही शुल्क आकारले जाईल. हा टोल नसेल. या शुल्काला टोल म्हणणे चुकीचे आहे. इराम आणि ओमान यावेळी एक नवा मसुदा तयार करत आहोत. या कराराअंतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी, ओमाचे आखात, पर्शियन आखात या भागातील पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा दिल्या जातील. त्यासाठी पर्यावरण कर वसूल करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही ओमानसोबत लवकरच एक करार करू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आता इराणने आम्ही टोल वसूल करणार नाही, असे सांगितल्याने व्यापारी जहाजांना फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ