Israel-India Relation : यहूदी धर्मगुरु गोमूत्रावरुन हिंदुंबद्दल वादग्रस्त, चीड येईल असं बोलला, इस्रायलने लगेच मागितली भारताची माफी

Israel-India Relation : "यहूदी आणि इस्रायलच्या मनात भारत आणि त्यांच्या धार्मिक परंपरांबद्दल खूप आदर भावना आहे. या जोकरच्या मूर्खपणामुळे आपल्या संबंधांच नुकसान होतय म्हणून आम्ही मनापासून माफी मागतो"

Israel-India Relation : यहूदी धर्मगुरु गोमूत्रावरुन हिंदुंबद्दल वादग्रस्त, चीड येईल असं बोलला, इस्रायलने लगेच मागितली भारताची माफी
Yosef mizrachi
| Updated on: Oct 31, 2026 | 12:16 PM

एका यहूदी धर्मगुरुने भारत आणि हिंदूंबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावरुन वाद वाढत चालला आहे. इजरायली-अमेरिकी रब्बी योसी मिजराहीने ही आक्षेपार्ह टिप्पणी केली. आता या प्रकरणात इस्रायली दूताने भारतीय आणि हिंदुंची माफी मागितली आहे. “यहूदी धर्मगुरू रब्बी योसी मिजराही जे बोलले ते खूप चुकीचं आणि आक्षेपार्ह आहे. ते यहूदी समुदाय आणि इस्रायलचं प्रतिनिधीत्व करत नाहीत” असं इस्रायली महावाणिज्य दूत यानीव रेवाच म्हणाले. यानीव रेवाच यांनी सोशल मिडिया पोस्टमधून आपली नाराजी व्यक्त केली. “योसी मिजराही यांनी हिंदू धर्माबद्दल खूप आक्षेपार्ह आणि विषारी टिप्पणी केली आहे. त्यांचा मी निषेध करतो” असं यानीव रेवाच म्हणाले. “योसी मिजराही यांना इस्रायल आणि ब्रिटनच्या मुख्य प्रवाहातील हिंदू समुदायाने पूर्णपणे बहिष्कृत केलं आहे. त्यांच्यापासून अंतर राखून असतात. या माणसाच्या वक्तव्यांमधून यहूदी समुदायाचा विचार दिसत नाही” असं रेवाच म्हणाले.

भारत-इस्रायल संबंधांचा उल्लेख करत इस्रायलचे महावाणिज्य दूत म्हणाले की, “यहूदी आणि इस्रायलच्या मनात भारत आणि त्यांच्या धार्मिक परंपरांबद्दल खूप आदर भावना आहे. या जोकरच्या मूर्खपणामुळे आपल्या संबंधांच नुकसान होतय म्हणून आम्ही मनापासून माफी मागतो” इस्रायलच्या दूतावासाने लगेच हे जे पाऊल उचललं, त्यातून दोन्ही देशांचे संबंध किती दृढ आहेत ते दिसून येतं.

Loading...

पूजा करतात आणि गोमूत्र चाटतात

योसी मिजराही यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात ते हिंदु धर्मीयांच्या गायीप्रती असलेल्या आस्थेची खिल्ली उडवताना दिसतायत. हिंदू गायीची पूजा करतात आणि गोमूत्र चाटतात. काही भारतीय डॉक्टर सुद्धा असं करतात असं योसी मिजराही या व्हिडिओत बोलताना दिसतायत.

इस्रायलमधूनही तिखट प्रतिक्रिया

मिजराही एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या गायीबद्दल सुद्धा अपमानास्पद टिप्पणी केली. भारतीय डॉक्टर्सची खिल्ली उडवली. म्हणाले की, रुग्णालयाच उपचारासाठी गेल्यानंतर असं वाटतं की डॉक्टरने आदल्यारात्री गोमूत्र पिलं असेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतातच नाही, तर इस्रायलमधूनही तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us