AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hamas War : जग हादरलं! शस्त्रसंधी धुडकावून पुन्हा फायरिंग, इस्रायलने थेट…पुन्हा युद्ध भडकणार?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. मात्र हमासच्या कुरापती अद्याप संपलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात हे युद्ध पुन्हा भडकणार का? असे विचारले जात आहे.

Israel Hamas War : जग हादरलं! शस्त्रसंधी धुडकावून पुन्हा फायरिंग, इस्रायलने थेट...पुन्हा युद्ध भडकणार?
israel and hamas war
| Updated on: Oct 14, 2025 | 8:29 PM
Share

Israel And Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिने या दोघांमध्ये शांतता करार झाला आहे. याच कराराचा पहिला टप्पा म्हणून हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली आणि इस्रायलने पॅलेस्टिनी नागिकांची सुटका केली आहे. हे युद्ध थांबल्यामळे संपूर्ण जगाने त्यांचे अभिनंदन केले आहे. असे असतानाच आता एकीकडे युद्ध थांबलेले असताना दुसरीकडे मात्र हमासकडून कथितपणे हल्ले केले जात आहेत. तसा दावा इस्रायली सैन्यान केले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेलया माहितीनुसार इस्रायली सैन्यावर काही संशयास्पद लोकांनी इस्रायल-गाझा यांच्यात असलेली यलो लाईन पार करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा दावा इस्रायली सैन्याने केल आहे. “आज सकाळी अनेक संदिग्ध लोकांनी पिवळी लाईन पार करण्याचा प्रयत्न केला. हे लोक उत्तर गाझा परिसरात इस्रायली सैन्याच्या दिशेने येत होते. शांती कराराचे हे थेट उल्लंघन आहे. इस्रायली सैन्याने या संदिग्धांनी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनी इस्रायली सैनिकांककडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संभाव्य धोका परतवून लावण्यासाठी इस्रायली सैन्यानेही गोळीबार चालू केला,” असे इस्रायली लष्कारने सांगितले आहे. तसेच इस्रायली सैनिकांच्या तळांवर घुसखोरी झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. गाझा पट्टीतील लोकांनी इस्रायली सैनिकांपासून दूर राहावे तसेच नियमांचे पालन करावे, असे आवाहनही इस्रायली सैन्याने केले आहे.

युद्धाला सुरुवात कधी झाली?

ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ला केला. पुढे युद्ध भडकले. गाझा पट्टीत आतापर्यंत 67 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे.

अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाही?

दरम्यान, सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार झाला आहे. असे असले तरी अजूनही हमासचे निशस्त्रीकरण, गाझावरील सत्ता तसेच पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता असे काही प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे सध्या घडवून आणलेली शस्त्रसंधी ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. हा कायमस्वरुपी उपाय नाही. असे असताना इस्रायल-हमास यांच्यात कोणता तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...