AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Isreael Hamas War : तिकडे हमासने 20 इस्रायलींची सुटका केली, अन् इकडे भारताने मोठा डाव टाकला, ट्रम्प यांचे नाव घेऊन थेट…

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. हमासने इस्रायलच्या 20 जणांची सुटका केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे कौतुक करणारा संदेश जारी केला आहे.

Isreael Hamas War : तिकडे हमासने 20 इस्रायलींची सुटका केली, अन् इकडे भारताने मोठा डाव टाकला, ट्रम्प यांचे नाव घेऊन थेट...
narendra modi
| Updated on: Oct 13, 2025 | 8:55 PM
Share

Narendra Modi : गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेलं इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अखेर थांबवलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबावे म्हणून प्रयत्नरत होते. अखेर त्यांनी आणलेल्या 20 कलमी शांतता करारावर हमास आणि इस्रायल या दोघांनीही सहमती दाकवली आणि हमासकडून ओलीस ठेवलेल्या 20 जिवंत इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, या ऐतिहासिक घटनेनंतर भारताने मात्र आपली कुटणीती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक

हमासने बंदी असलेल्या 20 इस्रायली नागरिकांची सुटका करताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी भारता हमास-इस्रायल युद्ध, हे युद्ध थांबवण्यासाठी घडवून आणलेला शांतता करार यावर भाष्य केले. विशेष म्हणजे मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन न्यातान्याहू यांची स्तुती केली. शांतता घडवू आणण्याच्या प्रक्रियेचे त्यांनी स्वागत केले आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंदी असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांची आम्ही स्वागत करतो. या काळात कैद्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य, धाडस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रामाणिक आणि अविरत मेहनतीलाही त्यांचे हे दोन वर्षांचे स्वातंत्र्य समर्पित आहे, असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

मोदींच्या ट्विटचा अर्थ काय?

इस्रायल-हमास असो किंवा रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष असो, भारताने नेहमीच शांततेच्या आणि संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना समर्थन दिलेले आहे. भारताची तशी भूमिका राहिलेली आहे. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र भारतावर टॅरिफ लादलेला आहे. याच कारणामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध काहीसे ताणलेले आहेत. हे संबंध पूर्ववत करण्यासाठी भारताकडून वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा केली आहे. त्यामुळे मोदींचे हे ट्विट भारताच्या कुटनीतीचाही एक भाग असू शकते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, शांतता कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर लवकरच या शांतता करारातील पुढच्या तरतुदींनुसार हमास आणि इस्रायलची पुढची वाटचाल चालू राहणार आहे. सध्यातरी हमासने कैद केलेल्या इस्रायलच्या नागरिकांची सुटका केल्याने युद्ध थांबले आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.