AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची इस्त्रायलने काढली लाज, थेट म्हटले, स्वत: जिहादी दहशतवादी आणि..

इराण आणि अमेरिका युद्धाला 1 महिला पूर्ण झाला. पण युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच पाकिस्तानकडून युद्ध थांबव्याकरिता मध्यस्थी घेतली जात आहे. यादरम्यानच आता इस्त्रायलकडून पाकिस्तानला चांगले फटकारण्यात आले.

पाकिस्तानची इस्त्रायलने काढली लाज, थेट म्हटले, स्वत: जिहादी दहशतवादी आणि..
Pakistan and Israel
| Updated on: Mar 31, 2026 | 11:25 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. आम्ही युद्ध थांबवत असल्याचे जगाला सांगताना पाकिस्तान दिसत आहे. यादरम्यानच इस्त्रायलकडून पाकिस्तानची लाज काढण्यात आली. एका मुलाखतीमध्ये बोलताना इस्त्रायलच्या विदेश मंत्र्यांचे विशेष दूत फ्लूर हसन नहूम यांनी म्हटले की, मला माहिती नाही की, पाकिस्तानला नक्की काय साध्य करायचे आहे. मला वाटते की, पाकिस्तानला स्वत: चे काैतुक करून घ्यायचे आहे. स्वत: ते जिहादी दहशतवादी आहेत, ते स्वत:चे जगासाठी मोठी समस्या आहेत. पण ते प्रयत्न करत आहेत. मला खरोखरच वाटत नाही की, त्यांना यश मिळेल. यादरम्यान त्यांनी या परिस्थितीमध्ये भारताकडून उचलण्यात आलेल्या पावलांवरही बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की, भारत हा इस्त्रायलच्या अत्यंत जवळ आहे.

तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की, युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान इस्त्रायलला आले होते. आम्हाला माहिती आहे की, भारत सर्वांसोबतच चांगले संबंध ठेवतो. पाकिस्तानपेक्षा कितीतरी जास्त पट तो मध्यस्थीसाठी चांगला ठरला असता. पण ठीक आहे, बघूयात पुढे परिस्थिती नक्की कशी राहते. पाकिस्तान विदेशमंत्री इशाक डार यांनी म्हटले होते की, साैदी अरेबिया, मिस्त्र, तुर्की यांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीसोबत इस्लामाबाद अमेरिका आणि इराण यांच्यात बैठक आयोजित करेल.

मात्र, आता हे स्पष्ट झाले की, इस्त्रायलला पाकिस्तानची मध्यस्थी अजिबात पसंत नाही. कारण पाकिस्तान दहशतवाद्याला थारा देतो. पाकिस्तानने आतापर्यंत भारतात अत्यंत मोठे हल्ले घडवून आणले. काही महिन्यांपूर्वी भारतासोबत युद्ध करण्याच्या तयारीत पाकिस्तान होता. पण दुसरीकडे इराण आणि अमेरिका युद्ध रोखण्याकरिता मध्यस्थी करत आहे.

इस्त्रायलला काही दिवसांपूर्वीच मोठी धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली. या युद्धाच्या मोठ्या झळा पाकिस्तानला बसत आहेत. लॉकडाऊन लागण्याची स्थिती पाकिस्तानमध्ये आहे. लवकरात लवकर युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतरही मोठे हल्ले केले जात आहेत. आता पाकिस्तानच्या मध्यस्थीला किती यश मिळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा