
गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. यात आता इस्रायल इब्राहिमी मशीद ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. कतारने यावर टीका केली आहे. इब्राहिमी मशीद ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या योजनेचा कतारने तीव्र निषेध केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “इब्राहिमी मशिदीचे प्रशासन आणि देखरेख पॅलेस्टिनी धर्मादाय आणि धार्मिक व्यवहार मंत्रालय आणि हेब्रोन नगरपालिकेकडून किरयत अरबा वसाहतीतील ज्यू धार्मिक परिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या इस्रायलच्या कब्जा योजनेचा कतार राज्य तीव्र निषेध करते.” दरम्यान, संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2 वर्षांपासून रक्तरंजित युद्ध
इस्रायल दीर्घकाळापासून पॅलेस्टाईनविरोधात युद्ध लढत आहे. गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात जवळपास 2 वर्षांपासून रक्तरंजित युद्ध सुरू आहे. या युद्धात गाझाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. इस्रायल इब्राहिमी मशीद ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कतारने यावर टीका केली आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये इस्रायलच्या योजनेचा निषेध केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “इब्राहिमी मशिदीचे प्रशासन आणि देखरेख पॅलेस्टिनी धर्मादाय आणि धार्मिक व्यवहार मंत्रालय आणि हेब्रोन नगरपालिकेकडून किरयत अरबा वसाहतीतील ज्यू धार्मिक परिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या इस्रायलच्या कब्जा योजनेचा कतार राज्य तीव्र निषेध करते.” आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे गंभीर उल्लंघन आणि जगभरातील मुस्लिमांविरोधात जाणीवपूर्वक चिथावणी देणे असे कतारचे मत आहे.
पॅलेस्टिनी प्रदेशातील इब्राहिमी मशीद आणि इतर पवित्र स्थळांची ऐतिहासिक आणि कायदेशीर स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कतार ठामपणे नकार देतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पॅलेस्टाईनमधील धार्मिक पावित्र्यांचे रक्षण करून आंतरराष्ट्रीय समुदायाने आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी पार पाडावी आणि पॅलेस्टिनी लोकांची अस्मिता पुसून टाकण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत, असा दबाव इस्रायली सत्ताधाऱ्यांवर टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पॅलेस्टाईनच्या हेब्रोन शहराच्या मध्यभागी असलेल्या इब्राहिमी मशिदीच्या आजूबाजूचा भाग ताब्यात घेण्याची इस्रायलची योजना आहे.
ही जमीन पॅलेस्टिनी इस्लामिक वक्फ आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाची आहे. इस्रायलला शहरातील प्रसिद्ध शुहादा स्ट्रीट होलसेल मार्केट वर कब्जा करून उद्ध्वस्त करायचे आहे. एका रिपोर्टनुसार, हेब्रोन शहराच्या मध्यभागी एक बेकायदेशीर इस्रायली वस्ती आहे, ज्यामध्ये 800 इस्रायली प्रचंड लष्करी सुरक्षेत राहतात.