
इस्रायल सात आघाड्यांवर युद्ध लढत आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सचे सैनिक हताश होत आहेत. मागच्या दोन आठवड्यात पाच इस्रायली सैनिकांनी जीवन संपवण्याचा पर्याय निवडला. यात गाजा आणि संघर्ष सुरु असलेल्या क्षेत्रात दीर्घ तैनातीनंतर सुट्टीवर आलेले सैनिक आणि रिझर्व्ह सैनिक आहेत. हमासने 7 ऑक्टोंबर 2023 रोजी इस्रायलवर घातक हल्ला केला. तेव्हापासून इस्रायल युद्धामध्ये आहे. RT च्या रिपोर्टनुसार गाजमध्ये सैनिकांची तैनाती सुरु झाल्यानंतर इस्रायली डिफेन्स फोर्सेसच्या सैनिकांच्या आत्महत्येत वाढ झाली. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 2023 च्या अखेरीस IDF च्या 7 सैनिकांनी आत्महत्या केली. 2024 मध्ये हा आकडा वाढून 21 झाला. आता चालू वर्षात आतापर्यंत 20 सैनिकांनी जीवन संपवलं आहे.
IDF मधील आत्महत्येच ताज प्रकरण 19 वर्षीय नार्वेजियनच आहे. ज्याला IDF मध्ये येऊन एकवर्षही झालं नव्हतं. सैन्यात सहभागी होण्यासाठी तो इस्रायलमध्ये आलेला. त्याची ट्रेनिंग सुरु होती. त्याने या रविवारी जीवन संपवलं. त्याशिवाय गोलानी ब्रिगेडच्या एका सैनिकाने एसडी तेइमान बेसवर स्वत:वर गोळी झाडून घेतली. अशाच प्रकारे पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरने पीडित रिझर्व्ह सैनिक डॅनियल एड्रीने स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवलं.
रिपोर्टमध्ये काय म्हटलय?
रिपोर्ट्नुसार सर्वात जास्त प्रकरण ड्युटीवर तैनात असलेल्या रिझर्व्ह सैनिकांशी संबंधित आहेत. रिपोर्टमध्ये एका सैन्य अधिकाऱ्याने नाव न छापण्यावर अटीवर सांगितलं की, “अधिकारी व्यक्तीगत, कौटुंबिक परिस्थितीऐवजी युद्धातीला आघातांना जबाबदार मानतात”
युद्ध माणूसच नाही, आत्मा सुद्धा मारतो
इस्रायली सैनिकांच्या आत्महत्येवर विरोधी पक्षनेते यायर लापिड म्हणाले की, “जितक्या सैनिकांनी आत्महत्या केलीय, ते प्रमाण चिंतेत टाकणारं आहे. युद्ध माणूसच नाही, आत्मा सुद्धा मारतो” मानसिक तणावामुळेच हजारो रिझर्व्ह सैनिकांनी युद्ध भुमीतून माघार घेतली, याची आयडीएफकडून पृष्टी करण्यात आली. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्या सैनिकांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय.
एकाचवेळी सात आघाड्यांवर युद्ध
इस्रायल यावेळी सात आघाड्यांवर युद्ध लढत आहे. गाजाशिवाय इराण आणि सीरियासोबतही त्यांचा तणाव आहे. इस्रायलने लेबनानमध्ये सुद्धा हवाई हल्ले केले. इराक, येमेन आणि वेस्ट बँकमध्ये सुद्धा इस्रायल एक्टिव आहे. सीरिया आणि इराणसोबत सीजफार झाला आहे. गाजामध्ये सीजफायरबद्दल अजून अनिश्चितता आहे.