AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

hamas israel war reason : ‘घरात दहशतवादी आहेत…’ इस्रायली महिलेचा पतीला शेवटचा कॉल, नंतर… व्हिडीओ आला समोर

Woman kidnapped by hamas : एका महिलेला दोन मुलींसह दहशतवाद्यांनी अपहरण केलं. दहशतवादी त्यांना त्यांच्या घरातून घेऊन गेले. त्यानंतर त्या महिलेने आपल्या पतीला शेवटचा कॉल केला.

hamas israel war reason : 'घरात दहशतवादी आहेत...' इस्रायली महिलेचा पतीला शेवटचा कॉल, नंतर... व्हिडीओ आला समोर
Israeli woman's last call to her husbandImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2023 | 11:26 AM
Share

नवी दिल्ली :  हमासकडून (hamas) इस्रायलवरती हल्ला (hamas israel war reason) केल्यापासून साधारण १०० लोकांचं अपहरण केलं आहे. त्यामध्ये डोरन एशर नावाचा एक महिला आणि तिच्या दोन मुली सुध्दा आहेत. त्यांना अन्य लोकांच्या सोबत एका गाडीतून इतर ठिकाणी आतंकवादी घेऊन गेले आहेत. डोरन यांच्या पतीने सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना एक कॉल केला होता. ती सांगत होती की, ‘आतंकवादी घरात घुसले, त्यानंतर तिचा फोन कट झाला. तेव्हापासून त्यांच्या पत्नीचा (Woman kidnapped by hamas) आवाज त्यांनी ऐकलेला नाही.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, डोरन तिच्या दोन मुलींसोबत सुट्टी निमित्त आपल्या आईच्या घरी गेली होती. सध्या डोरनचा फोन ट्रॅक केला आहे. डोरनचं लोकेशन सुध्दा मिळालं आहे. डोरनचा पती अधिक घाबरला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये महिला आणि मुलांना हमासचे आतंकवादी बंदुकीचा धाक दाखवून एका गाडीत भरत आहेत.

त्या व्हिडीओमध्ये योनी याने आपली पत्नी आणि दोन मुलींना ओळखलं आहे. ते सांगत आहे की, ‘मी माझ्या दोन मुलींना आणि बायकोला त्या व्हिडीओमध्ये पाहिलं आहे. माझी सासू सुध्दा त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

त्यांनी सांगितलं की, त्यांना दोन मुली आहे आहेत. त्या मुली अधिक लहान आहे. त्यामध्ये एका मुलीचं वय ५ वर्षे,तर एका मुलीचं वय ३ वर्षे आहे. मला माहित नाही त्या लोकांना ते आतंकवादी कुठे घेऊन गेले आहेत. त्याने हमासला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे, त्या बदल्यात तो ओलीस राहण्यास तयार झाला आहे. त्यांनी हमासला सांगितलं आहे की, माझ्या कुटुंबाला कसल्याची प्रकारचा त्रास देऊ नये. त्यांच्या जाग्यावर तुम्हाला मला ताब्यात घ्यायचं असेल, तर मी तयार आहे.

हमासच्या हल्लानंतर ७०० इस्रायलच्या लोकांचा मृत्यू झाला आहे. १५०० लोकं जखमी झाली आहे. सोशल मीडियावरती लोकांच्या अपहरणाचे विविध व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये एक विद्यार्थींनी जोरात ओरडत असल्याची पाहायला मिळत आहे. हमासचे आतंकवादी लोकांना बाईकवरती बसवून अपहरण करीत आहेत. त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला सुध्दा आतंकवाद्यांनी ताब्यात घेतलं आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.