AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल देव यांनी उडवली पाकिस्तानची झोप, एका ई-मेलमुळे….इमरान खान यांच्या मदतीला गेले धावून!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या मदतीला भारताचे माजी क्रिकेटपटू कपील देव आणि सुनील गावस्कर धावून आले आहेत. त्यांनी पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

कपिल देव यांनी उडवली पाकिस्तानची झोप, एका ई-मेलमुळे....इमरान खान यांच्या मदतीला गेले धावून!
kapil dev and imran khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 17, 2026 | 4:02 PM
Share

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानला 1992 साली विश्वचषक जिंकून देणारे माजी क्रिकेटर इमरान खान सध्या तरुंगात आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ते 2023 सालापासून तुरुंगात आहेत. त्यांना पाकिस्तानातील लाहोर शहरात अटक करण्यात आली होती. सध्या ते रावळपिंडी येथील तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे इमरान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांशीही भेटू दिले जात नसल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे इमरान खान यांची प्रकृती तसेच त्यांच्यावर होत असलेला कथित अन्याय जागतिक पातळीवर चर्चेचा मुद्दा झाला आहे. असे असतानाच आता भारताचे कधीकाळचे स्टार क्रिकेटर इमरान खान यांच्या मदतीला धावून गेले आहेत. इमरान खानची मदत करून इच्छिणाऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव आणि माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांचा समावश आहे.

एकूण 14 कर्णधारांचा मेल

मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या देशातील दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान सरकारला एक ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये इमरान खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच इमरान खान यांच्या प्रकृतीचा विचार करून या एकूण 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तानी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

ई-मेलमध्ये नेमकं काय लिहिलं आहे?

वेगवेगळ्या देशांच्या 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले आहे. इमरान खान हे पाकिस्तानमधीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहेते. इमरान खान यांच्याच नेतृत्त्वत 1992 साली पाकिस्ताने विश्वविजेतेपद पटकावले. पाकिस्तानी क्रिकेटला पुढे नेण्यात इमरान खान यांचे मोठे योगदान आहे. ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे, असे म्हणत या मेलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच इमरान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे. त्यांना उपचारासाठी हवा तो डॉक्टर उपलब्ध करून द्यावा. तसेच तुरुंगात त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे मानवी व्यवहार करावा, अशा मागण्याही यात करण्यात आल्या आहेत.

आणखी कोणीकोणी मागणी केली?

दरम्यान, या ई-मेलची पाकिस्तान सरकार किती दखल घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कपील देव, सुनील गावस्कर यांच्यासोबतच कपिल आणि सुनील गावस्कर व्यतिरिक्त, मायकेल आथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल बेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, क्लाइव्ह लॉयड आणि स्टीव्ह वॉ यांनीही इमरान खान यांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार