AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! किम जोंग ऊनकडून युद्धाची तयारी? एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा खतरनाक मिसाईलची चाचणी

Kim Jong Un : अमेरिका आणि इस्रायलकडून सतत इराणवर भीषण हल्ले केले जात आहेत. अशातच आता उत्तर कोरियाकडून वेगवेगळ्या शस्त्रांची चाचणी सुरू आहे. किम जोंग ऊन यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मिसाईलची चाचणी घेतली आहे.

मोठी बातमी! किम जोंग ऊनकडून युद्धाची तयारी? एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा खतरनाक मिसाईलची चाचणी
kim jongImage Credit source: Google
| Updated on: Mar 11, 2026 | 5:55 PM
Share

मध्य पूर्वेत भयानक युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्रायलकडून सतत इराणवर भीषण हल्ले केले जात आहेत. जगभरातील देश हे युद्ध थांबवण्याची विनंती करत आहेत. अशातत आता काही देशांनी सावध पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाकडून वेगवेगळ्या शस्त्रांची चाचणी सुरू आहे. किम जोंग ऊन यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मिसाईलची चाचणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उत्तर कोरिया युद्धात तर उतरणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाने एका आठवड्यात दुसऱ्यांदा क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, किम जोंग ऊन यांनी आपल्या मुलीसह नव्या 5,000 टन क्षमतेच्या युद्धनौकेतून स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाइलची चाचणी पाहिली. ही चाचणी मंगळवारी उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यावर करण्यात आली. सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार गेल्या एका आठवड्यातील ही दुसरी अशी मिसाइल चाचणी आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी एका गुप्त ठिकाणावरून व्हिडिओ लिंकद्वारे ही संपूर्ण चाचणी पाहिली. यावेळी त्यांची लहान मुलगी किम जू ए देखील त्यांच्यासोबत होती. किम जू ए सुमारे 13 वर्षांची आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्येही ती एका मिसाइल चाचणीदरम्यान किम जोंग उन यांच्यासोबत होती. या चाचणीचा उद्देश युद्धासारख्या परिस्थितीत कमांड आणि कंट्रोल सिस्टीमची तपासणी करणे हा होता. KCNA च्या म्हणण्यानुसार, या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्र क्षमता गंभीर असल्याचेही दाखवण्याचा प्रयत्न केला.

मिसाइल्स 3 तास हवेत उडत होत्या

संपूर्ण जगावर युद्धाचे सावट असताना ही चाचणी करण्यात आली आहे. समोर आलेल्या अहवालांनुसार, नंबर-51 चोए ह्योन नावाच्या नव्या डिस्ट्रॉयर जहाजावरून नम्फो किनाऱ्याजवळ अनेक क्रूझ मिसाइल्स वेगाने डागण्यात आल्या. या मिसाइल्स कोरियाच्या पश्चिम समुद्रावर सुमारे 3 तास उडत राहिल्या आणि नंतर बेटांवर तयार केलेल्या लक्ष्यांवर आदळल्या. याआधी 4 मार्च रोजी झालेल्या चाचणीत याच जहाजावरून पाच मिसाइल्स डागण्यात आल्या होत्या.

चाचणीबाबत किम समाधानी

KCNA ने दिलेल्या माहितीनुसार किम जोंग ऊन यांनी चाचणी यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘या चाचणीमुळे देशाच्या रणनीतिक शस्त्रांच्या कमांड सिस्टीमची आणि युद्धनौकेच्या लढाऊ क्षमतेची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्र शक्ती आता विविध प्रकारे वापरता येणाऱ्या नव्या टप्प्यात पोहोचली आहे आणि देशाची युद्ध रोखण्याची क्षमता वेगाने मजबूत होत आहे.’

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...