AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, अमेरिकेचं नाक दाबलं, आता युद्ध थांबणार किंवा थेट महायुद्धच…

इराणने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता संपूर्ण जगाची मोठी कोंडी होण्याची शक्यता असून, अमेरिकेवर हे युद्ध थांबवण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, अमेरिकेचं नाक दाबलं, आता युद्ध थांबणार किंवा थेट महायुद्धच...
America, Israel Iran WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 4:31 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 12 वा दिवस आहे. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रालयकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपला लढा सुरूच ठेवला आहे. इराणकडून सातत्याने अमेरिकनं सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे. इस्त्रायलवर देखील मोठे मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील नुकसान झालं आहे. अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा फटका हा केवळ या तीन देशांनाच बसला नाही, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झळ बसली आहे. मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, याचा परिणाम म्हणजे अनेक देशांमध्ये सध्या प्रचंड प्रामाणत इंधन तुटवडा जाणवत आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस असंच चाललं तर जगाला भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान हे युद्ध सुरू असतानाच इराणने मोठा निर्णय घेतला होता. इराणने अमेरिका, युरोपीयन देश आणि अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांसाठी होर्मुरजची सामुद्रधुनी बंद केली आहे. जर या देशांनी या मार्गाने तेल वाहतूक केली तर आम्ही तेल जहाजांवर मिसाईल हल्ले करू असा इशाराच इराणकडून देण्यात आला आहे. सर्व जगासाठी स्ट्रेट ऑफ मोर्मुरज हा महत्त्वाचा मार्ग आहे, कारण जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. दरम्यान इराणने काही देशांसाठी हा मार्ग बंद केला आहे, तर काही देश हे हल्ल्यांच्या भीतीनं या मार्गानं वाहतूक टाळत आहेत, त्यामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आहे.

दरम्यान हे सगळं सुरू असातनाच आता इराणने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता इराण सुएझ कालवा बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. जर सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद झाला तर हा युरोपीयन राष्ट्रांसाठी सर्वात मोठा फटका असणार आहे. जुएझ कालवा हा युरोप आणि मध्य पूर्वेमधील देशांसाठी लाईफ -लाईन मानला जातो. दरम्यान इराने आता हा कालवा बंद करण्यासाठी आपले हुती बंडखोर सक्रिय केले आहेत.सुएझ कालवा हा लाल समुद्राच्या मार्गेच जातो, आणि लाल समुद्रावर सध्या हुती बंडखोरांची चांगली पकड आहे. त्यामुळे इराणच्या सांगण्यावरून आता हा रस्ता बंद करण्यासाठी हुती समर्थक कोणत्याही क्षणी या मार्गावर मिसाईल हल्ला करण्याची शक्यता आहे. दरम्यान हा मार्ग जर वाहतुकीसाठी बंद झाला तर संपूर्ण युरोपमधील निर्यात बंद होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीमध्ये युद्ध बंद करण्यासाठी आता अमेरिकेवर दबाव वाढवू शकतो. कींवा जर युद्ध बंद झालं नाही तर युद्धाचं महाभयंकर रूप जगाला पहायला मिळू शकतं.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!