
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात काल हिंसक आंदोलन झालं. यात 21 जणांचा मृत्यू झाला. संध्याकाळी नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाची इमर्जन्सी बैठक झाली. सरकारने सोमवारी रात्री उशिरा बंदी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. सरकारने युवकांना प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली. युवकांनी सांगितलय की, आज मंगळवारी प्रदर्शन अजून जोरात करणार. नेपाळी संसद भवनाबाहेर आज मंगळवारी हळूहळू गर्दी जमू लागली आहे. संसद भवनाबाहेर तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या खुणा स्पष्टपणे दिसतायत. लोकांनी पंतप्रधान केपी ओली यांना हटवण्याची आणि पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ‘केपी चोर… देश छोड़’ अशा घोषणा नेपाळमध्ये दिल्या जात आहेत. आमचं आंदोलन फक्त सोशल मीडिया विरोधात नाहीय, तर नेपाळमधून भ्रष्टाचार सुद्धा हद्दपार झाला पाहिजे असं आंदोलकांनी सांगितलं.
एका आंदोलकाने सोमवारी रात्री सांगितलं की, “आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून प्रदर्शन करतोय.भ्रष्टाचाराने टोक गाठलं आहे. हेच विरोध प्रदर्शनाच मुख्य कारण आहे” ‘आम्ही इथे जखमी आंदोलकांना मदत करत आहोत. मंगळवारपासून विरोध प्रदर्शन अजून जोर पकडेल’ असं या आंदोलकाने सांगितलं. “आम्ही भ्रष्टाचाराविरोधात प्रदर्शन करत आहोत. नेत्यांच आयुष्य आणि आमचं जीवन यात भरपूर फरक आहे. हे चुकीच आहे. आमचा पैसा योग्य ठिकाणी जात नाही. देशाचे मोठे नेते आणि त्यांचे लोक भ्रष्ट आहेत. आमचा पंतप्रधान सर्वात खराब आहे. विद्यार्थी फक्त भ्रष्टाचार बंद करायला सांगत आहेत. पण त्यांना गोळ्या घातल्या जातायत. पोलिसांनी गुडघ्याच्या खाली गोळ्या मारल्या असत्या, तर ठीक होतं. पण त्यांनी लोकांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या मारल्या” असं एका आंदोलकाने सांगितल.
काठमांडूमध्ये एका आंदोलकाने सांगितलं की, मी बातम्यांमध्ये बघितलं की, “अनेक लोक जखमी आहेत. त्यांना गोळी लागलेली. म्हणून मी रक्तदान करण्यासाठी आलो. आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे. आम्ही त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आलो आहोत असं काठमांडूमध्ये एका आंदोलकाने सांगितलं”
#WATCH | Kathmandu, Nepal: A protester says, “We were protesting since 9 AM… Corruption has reached the top level. This is the most important reason for the protest… We are serving at the hospital for the protestors being treated here… The protest will go even higher now… https://t.co/jLA7fEJTfG pic.twitter.com/u8KV9DWR3O
— ANI (@ANI) September 9, 2025
Nepo Kid ट्रेंडही चालवला
युवकांच्या या आंदोलनात सोशल मीडिया बॅनशिवाय बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदी हे सुद्धा मुद्दे आहेत. युवकांना याच मुद्यावरुन सरकारला घेरायचं आहे. त्यांनी सोशल मीडियावर Nepo Kid ट्रेंडही चालवला. नेत्यांची मुल भ्रष्टाचाराच्या पैशाने ऐश करत असल्याचा आरोप केला. आम्ही बेरोजगार आहोत. भ्रष्टाचार संपवण्याचा ओली सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप या आंदोलकाने केला.