अमेरिकेतील निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांचा बोलबाल, थेट इतके जण विजयी, डोनाल्ड ट्रम्प यांना दणका..

अमेरिकेतील निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. अनपेक्षित निकाल पुढे आलीत. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबतच्या युद्धाचा झटका बसताना दिसत आहे.

अमेरिकेतील निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांचा बोलबाल, थेट इतके जण विजयी, डोनाल्ड ट्रम्प यांना दणका..
US midterm election
| Updated on: Nov 04, 2026 | 9:35 AM

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता धक्कादायक निकाल पुढे येत आहेत. पिया दांडिया, अरुणा मिलर आणि सुहास सुब्रमण्यम यांचा समावेश विजयी उमेदवारांमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या निकालानंतरही इराणबद्दल निर्णय घेण्याच्या तयारीत होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना धक्का बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील या निवडणुकीत भारताचा बोलबोला हा बघायला मिळतोय. पिया दांडिया या अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी फ्लोरिडामधून अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये जागा जिंकली आहे. त्या भारतीय वंशाच्या आहेत.

या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकन मरीन दलाचे माजी सैनिक, केसी अस्कार यांचा जोरदार मतांनी पराभव केला. दणदणीत या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. दांडिया यांना 51.9 टक्के मते मिळवली असून त्या अमेरिकन काँग्रेसमधील भारतीय अमेरिकन समुदायाच्या नवीन सदस्य बनल्या आहेत. हा त्यांचा एक मोठा विजय म्हणावा लागेल.

Loading...

भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम यांनी अमेरिकेतील भारतीय अमेरिकी समुदायाला नवीन दिशा दिली. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते असलेले सुब्रमण्यम व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करत पुन्हा एकदा अमेरिकन काँग्रेससाठी निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी बराक ओबामा यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. आता पुन्हा ते अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ही त्यांची एक दमदार कामगिरी म्हणावी लागेल.

अरुणा मिलर या अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षातील एक नेत्या आहेत. भारतीय वंशाच्या या अमेरिकन नेत्याची मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी पुन्हा निवड झाली आहे. मिलर यांनी रिपब्लिकन उमेदवार रॉब क्रॉप यांचा पराभव केला. या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. मात्र, त्यापूर्वीच भारतीय वंशाच्या लोकांना मोठे यश अमेरिकेच्या या निवडणुकीत मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. अपेक्षित निकाल त्यांच्या बाजूने लागत नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us