भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला, प्रवाशांनी पकडताच ओमानच्या पायलटचे धक्कादायक शब्द..
फ्लायदुबईचे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ओमानच्या पायलटकडून करण्यात आला. या पायलटला भारतीय पायलटने रोखले. त्याच्यावर मोठा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी असूनही भारतीय पायलटने हार मानली नाही. तो शेवटपर्यंत लढत राहिला, ज्यामुळे 180 लोकांचे जीव वाचले.

दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या विमानात धक्कादायक घटना घडली. फ्लायदुबईच्या विमानातील भारतीय पायलट स्मित मच्छार याला गंभीर जखमी करण्यात आले. गंभीर जखमी असतानाही स्मित याने 180 लोकांचे जीव वाचवले. मरण डोळ्यांसमोर असतानाही त्याने हार मानली नाही. वार होत असतानाही त्याने आपत्कालीन कोड पाठवले. यासोबतच विमानाचे अपहरण होत असल्याचे संकेत त्याने पाठवले. यादरम्यानच त्याने कॉकपिटचा दरवाजाही उघडला. ज्यानंतर जोरात आवाज केला. त्यानंतर तात्काळ प्रवासी मदतीला आले. काही वेळातच विमान सुरक्षित उतरवण्यात आले. मुळ मुंबईच्या घाटकोपरचा असलेल्या स्मितने जे काही केले, त्याचे जोरदार काैतुक केले जात आहे. त्यातच जगभरातून स्मित याचे काैतुक होत आहे. नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याने स्मित याच्यासोबत संवाद साधला.
दुबईहून इस्त्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात नक्की काय झाले आणि विमान क्रॅश करणाऱ्या ओमानच्या पायलटला असे नक्की का करायचे होते, हे जगाला जाणून घ्यायचे आहे. विविध चर्चा यावर रंगताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, पायलट स्मित मच्छार याने ज्यावेळी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवाशांनी ओमानच्या को पायलटला पकडले, त्यावेळी तो मला मारा… मला मारा असे म्हणताना दिसत होता.
इस्त्रायल आणि ओमान यांच्यात व्दिपक्षीय संबंध नाहीत. दोन्ही देशात 36 चा आकडा असताना इस्त्रायलच्या विमानासाठी ओमानच्या पायलटला नक्की का पाठवले असा प्रश्न निर्माण केला जातो. यासोबतच नेतन्याहू यांनी म्हटले की, ओमानचा पायलट कट्टरपंथी होता, हे नाकारले जाऊ शकत नाही. सध्या या प्रकरणात चाैकशी सुरू आहे. लवकरच काही गोष्टी उघडकीस येतील.
फ्लायदुबईचे विमान ओमानच्या पायलटने क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला भारतीय पायलटने रोखले. त्यानंतर त्याने थेट भारतीय पायलटवर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ज्यानंतर कॉकपिटचा दरवाजा स्मित यांनी उघडला. प्रवाशांनी ओमानच्या पायलटला पकडून ठेवले. सध्या त्याची चाैकशी सुरू आहे. आता या पायलटचे संबंध नक्की कोणत्या संघटनेशी आहे, याची चाैकशी केली जात आहे.
