AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मित मच्छार यांना थेट नरेंद्र मोदी यांचा फोन, कुटुंबियांना दिले मोठे वचन, 180 लोकांसाठी भिडणारा..

फ्लायदुबईचा भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर जगभरातून काैतुक होत आहे. त्यातच स्मितने जे केले त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्षही त्याचे काैतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्या कुटुंबियांना फोन केला.

स्मित मच्छार यांना थेट नरेंद्र मोदी यांचा फोन, कुटुंबियांना दिले मोठे वचन, 180 लोकांसाठी भिडणारा..
Narendra Modi Smit Machhar
| Updated on: Oct 01, 2026 | 12:50 PM
Share

फ्लायदुबईचा भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी जी कामगिरी केली, त्यांच्या या कामगिरीचे जगभरात काैतुक होत आहे. अनेक देशांच्या पंतप्रधानांनी त्यांचे काैतुक केले. स्मित मच्छार यांनी जे धैर्य आणि शाैर्य दाखवले ते कमी जणांना दाखवता येते. आज त्यांच्यामुळेच 180 जण विमानातील जिवंत आहेत. फ्लायदुबईचे विमान तेल अवीवकडे निघाले होते. दुबईहून हे विमान निघाले. मात्र, विमानाचा को पायलटने थेट पायलट असलेल्या स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. यादरम्यानच जखमी असतानाही आपत्कालीन स्थितीचे कोड स्मित मच्छर यांनी पाठवले. विमान कोणत्यातरी आपत्कालीन स्थिती असल्याचा संदेश पोहोचला. त्यानंतर इस्त्रायलमध्ये घडामोडींना वेग आला. या विमानाचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी तात्काळ बैठक बोलावली.

फ्लायदुबईच्या विमानात असलेल्या को पायलटने स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करत विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ला झाल्यानंतरही विमान क्रॅश होण्यापासून स्मित मच्छार यांनी वाचवले. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि आवाज दिला. विमानातील प्रवाशांच्या लक्षात आले की, नक्की काय घडतंय. प्रवाशांनी विमानाचा ओमानचा को पायलट याला पकडले.

त्यानंतर जखमी असतानाही स्मित यांनी सुरक्षित विमान उतरवले. ज्यानंतर स्मित यांचे जोरदार काैतुक केले जात आहे. 180 जणांचा जीव वाचवण्यासाठी भिडणारा भारतीय पायलटचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काैतुक केले. नुसते काैतुकच नाही तर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही फोन केला. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांसोबत फोनवर संवाद साधला.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पायलट मच्छार यांच्यावर सध्या साैदी अरेबियाच्या एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पायलटची स्थिती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांना फोन करत सांगितले की, भारतीय दूतावास सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कुटुंबात प्रत्येक प्रकारची मदत केली जाईल. या फोनवरील संवादापूर्वी नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...