मोठी दहशत! विमानतळावर अचानक 17 ड्रोन, तात्काळ विमानसेवा बंद, जगात खळबळ

रशिया-युक्रेन युद्ध सध्या अधिक पेटल्याचे बघायला मिळतंय. पुतिन यांनी नाटो देशांवर गंभीर आरोप केली आहेत. त्यामध्येच आता मोठी खळबळ जगात पसरली आहे. अचानक 17 ड्रोन विमानतळावर दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी दहशत! विमानतळावर अचानक 17 ड्रोन, तात्काळ विमानसेवा बंद, जगात खळबळ
airport
| Updated on: Oct 03, 2025 | 11:49 AM

युक्रेन-रशिया युद्धात जगातील अनेक देशांनी उडी घेतल्याने हे युद्ध अधिकच पेटल्याचे बघायला मिळतंय. पुतिन यांनी नुकताच म्हटले की, आम्ही फक्त युक्रेनसोबत नाही तर पूर्ण नाटोसोबत लढत आहोत. नाटो देश या युद्धात उतरल्याचा दावा पुतिन यांनी केला. यासोबतच त्यांनी म्हटले की, आम्हाला नाटो देशांसोबत लढायचे नाही पण ते रशियाला बदनाम करून युद्ध पुकारत असतील तर त्यांना तसेच उत्तर दिले जाईल. आता युक्रेनने घातक मिसाईल अमेरिकेकडे मागितली आहेत, त्याने खळबळ उडालीये. हे मिसाईल युकेनला देण्याच्या अगोदरच रशियाने मोठा इशारा देत म्हटले की, यामुळे वातावरण अधिकच चिघळेल आणि अमेरिका रशिया संबंध खराब होतील.

जर्मनी देखील रशियावर आरोप करताना दिसत आहे. आता त्यामध्येच जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले म्युनिक विमानतळ शुक्रवारी 17 ड्रोन दिसल्यामुळे बंद करण्यात आले. यासोबतच हे ड्रोन रशियाचे असल्याचाही दावा करण्यात आला. म्युनिक विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विमानतळ परिसरात ड्रोन दिसल्याने 17 विमान उड्ढाणे रद्द करण्यात आली. हेच नाही तर म्युनिक विमानतळावर येणारी विमाने दुसऱ्या विमानतळावर उतरवण्यात आली.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि पहाटे 5 पासून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली. युरोपमधील नाटो देशांमध्ये सतत ड्रोन दिसण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. पोलिश आणि डॅनिशच्या हवाई हद्दीत देखील ड्रोन दिल्याचे प्रकार घडली आहेत. मात्र, हे ड्रोन नेमके कोणाचे याबद्दल खुलासा होऊ शकला नाही.

म्युनिक विमानतळावरून मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. हे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांमध्ये अचानक ड्रोन अलर्टचा परिणाम केवळ विमानतळावरच नाही तर संपूर्ण विमान व्यवस्थेवर झाला. युरोपियन युनियन (EU) च्या नेत्यांनी गुरुवारी डॅनिश राजधानी कोपनहेगन येथे ड्रोन घटनांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. रशियाचे ड्रोन असल्याचा अंदाज लावला जातोय. मात्र, पुतिन यांनी अगोदरच स्पष्ट केले की, रशियावर खोटे आरोप नाटो देशांकडून सतत केली जात आहेत.