Nepal Flood: नेपाळमधील विनाशकारी महापूरात 955 जणांचा बळी, अजूनही शेकडो बेपत्ता, कामगारांच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद, Video समोर
Nepal Flood -Rescue Operation: नेपाळमध्ये गेल्या बुधवारी आलेल्या विनाशकारी महापूराने बळींची संख्या 955 वर पोहचली आहे. तर 4471 लोक बेपत्ता झाले आहेत. दरम्यान नेपाळच्या लष्कराने जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्याचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.

नेपाळमध्ये गेल्या बुधवारी विनाशकारी महापूर आला. तिबेटमधील हिम तलाव अचानक फुटल्याने महापूर उत्तरी नेपाळमध्ये धडकला. भोटेकाशी आणि त्रिशुला या नद्यांमधून यमदूत आले. या जलप्रलयात आता मृतांचा आकडा हजारांच्या घरात पोहचला आहे. महापूरात आतापर्यंत 955 वर पोहचली आहे. तर 4471 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता स्थानिक आणि परदेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. मृतदेह हाती लागत असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. दरम्यान नेपाळच्या लष्कराने जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका केली. त्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. त्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मृतांचा आकडा वाढला
नेपाळमधील राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चितवन जिल्ह्यातून 279, नवलपारसी पूर्वमधून 216, नवलपारसी पश्चिममधून 168, गोरखा जिल्ह्यातून 65 मृतदेह हाती लागले आहेत. तर नुवाकोट जिल्ह्यातून 95, धडिंगमधून 55, तनाहूमधून 38, रसुवा जिल्ह्यातून 23 आणि इतर ठिकाणाहून मृतदेह हाती लागले आहेत. एकूण 4471 लोक बेपत्ता झाले आहेत. त्यात स्थानिकांसह परदेशी नागरिक आणि जवळपास 100 सैनिकांचा समावेश आहे.
BREAKING: Death toll from Nepal-China flood has risen to 955, with over 4471 people missing.
— The Spectator Index (@spectatorindex) August 31, 2026
जवळपास 39 देशातील 591 नागरीक बेपत्ता आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, इटली, माल्टा, तुर्की, स्वित्झर्लंड आणि पोर्तुगाल या देशांचा यामध्ये समावेश आहे. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक लोकांची सुटका करण्यात यश आले आहे. तर 275 भारतीय अद्यापही या नैसर्गित आपत्तीत बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
रसुवागढी हाइड्रोको सुरूङभित्र कोही भेटिएनन्।💔😴 pic.twitter.com/2XZjOsvW0y
— Nirmal Prasai🇳🇵 (@NirmalPrasai5) August 31, 2026
जलविद्युत प्रकल्पातून कामगारांच्या सुटकेचा थरार
उत्तरी नेपाळमध्ये विविध विकास कामं आणि जलविद्युत प्रकल्पाची कामं सुरू होती. नेपाळच्या लष्कराने रासुवागढी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये शोध आणि बचाव कार्य राबवले. यासोबतच लॉगटांग जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये बचाव पथकाला कामगारांची सुटका करताना मोठी कसरत करावी लागली. अंधाऱ्या बोगद्यात कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे या व्हिडिओतून दिसते. त्याठिकाणी अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसला.
लाङटाङ जलविद्युत आयोजनाको सुरङभित्र उद्धार टोली……… “अँध्यारो सुरुङभित्र पनि आशा कहिल्यै निभ्दैन”#NepaliArmy #BhoteKoshiFlood pic.twitter.com/ZgIHxnqZTr
— Nepali Army (@NepaliArmyHQ) August 31, 2026
या बोगद्यात चिखलामुळे आणि इतर अडचणींमुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत असले तरी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पात अनेक भारतीय कामगार सुद्धा काम करत होते. त्यांच्याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एका माहितीनुसार, रासुवागढी येथील बोगद्यात एकही कामगार सापडलेला नाही. नेपाळचे लष्कर या दोन्ही बोगद्यात कामगारांचा शोध घेत आहेत. तर इतर ठिकाणीही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातून कामगार सुरक्षित आहेत की नाही याची माहिती लवकरच समोर येईल.
