AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal flood viral dog: घर वाहून गेले, काही राहिलं नाही… तरीही कुत्रा तिथेच बसला; मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट, काळीज पिळवटून टाकणारी घटना

Nepal flood viral dog: नेपाळमधील पुरामुळे चार घरे वाहून गेली, पण एक काळा-पांढरा कुत्रा अजूनही आपल्या जुन्या घराच्या जागी बसला आहे. जेसीबी आणि मदतकार्य करणाऱ्यांनी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिथून हलत नाही. मालक कोण आहेत हे कोणालाच माहीत नाही आणि लोक त्याच्याजवळ खाणे-पिणे ठेवत आहेत.

Nepal flood viral dog: घर वाहून गेले, काही राहिलं नाही... तरीही कुत्रा तिथेच बसला; मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट, काळीज पिळवटून टाकणारी घटना
Dog in nepal FloodImage Credit source: AP
| Updated on: Sep 01, 2026 | 7:54 AM
Share

नेपाळच्या त्रिशूली बाजारात पुराच्या विनाशानंतर एका कुत्र्याचे फोटो पाहून लोक भावूक झाले आहेत. चार घरांची रांग पूर्णपणे वाहून गेली, पण काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा कुत्रा अजूनही त्याच जागी बसला आहे. मदतकार्य करणाऱ्यांनी त्याला हलवण्याचे प्रयत्न केले आहेत, पण तो आपली जागा सोडायला तयार नाही. काळीज पिळवटून टाकणारे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेपाळच्या त्रिशूली बाजारात गेल्या आठवड्यात आलेल्या पुराने मागे विनाशाची चिन्हे सोडली आहे. चार घरांची संपूर्ण रांग वाहून गेली. जिथे कधी घर आणि अंगण असायचे, तिथे आता चिखल, मलबा आणि ढासळलेल्या अवशेषांचे दर्शन होत आहे. याच मलब्यामध्ये एक काळा-पांढरा कुत्रा अजूनही त्याच जागी बसला आहे. त्याच्या गळ्यात अजूनही पट्टा बांधलेला आहे. आजूबाजूला अर्धा डझन जेसीबी मशीन आणि मदतकार्य करणारे लाकूड, गाळ आणि मलबा काढण्यात गुंतले आहेत, पण जड मशीनच्या आवाजाचाही या कुत्र्यावर काही परिणाम होत नाही.

जिथे त्याचे घर होते तिथेच तो परतला

मदतकार्य करणारे विक्रम थापा यांच्या मते, सुरुवातीला लोकांनी त्याला बिस्किटे देऊन आणि वेगवेगळ्या नावांनी हाक मारून तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. पण कुत्रा त्यांच्याकडे पाहातही नाही. तो वारंवार त्या जागी परत येतो, जिथे चार घरांपैकी एका घराचे मुख्य दार असायचे. थापा यांनी सांगितले की कुत्रा ही जागा सोडायलाच तयार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मलबा काढण्याच्या कामात गुंतलेल्या सुनील तामांग यांनी सांगितले की जेसीबीचा जोरात आवाज आणि खोदकाम करणाऱ्या मशीनजवळ येऊनही कुत्रा आपल्या जागेवरून हलला नाही. तो चिखलाने भरलेल्या खड्ड्यात शांत बसून राहतो आणि त्या मर्यादेपलीकडे जात नाही, जिथे कधी त्याचे अंगण असायचे. कधीकधी एखाद्या वाहनाच्या येण्याचा किंवा मलब्यामधून लोकांच्या जाण्याचा आवाज झाला की तो डोके वर करतो. पण तो तिथून गेल्यावर पुन्हा त्याच जागी जाऊन बसतो.

कुत्रा कोणाचा होता, हे कोणालाच माहीत नाही

पुरात कुत्र्याचे घरही बाकीच्या संपूर्ण परिसरासोबत वाहून गेले. घटनास्थळी उपस्थित कोणालाही हे सांगता आले नाही की त्याचा मालक कोण होता किंवा तो चार घरांपैकी कोणत्या घरात राहत होता. मात्र, तो वारंवार त्याच जुन्या दाराच्या जागी परत येतो आणि त्या जागेपलीकडे जात नाही, जिथे कधी घराचे अंगण असायचे. यामुळे लोकांना वाटते की ती जागा त्याचे क्षेत्र असणार.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु