
कोरोना व्हायरसने पुन्हा डोकेवर काढले आहे. भारतापासून थायलंड, हाँगकाँग ते सिंगापूरात कोरोनाचे केस वाढतायत…परंतू अमेरिकेत कोरोनाच्या मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. अमेरिक शेकडो लोकांचा मृत्यू नव्या कोरोनाने झाला आहे. म्हणजे कोरोना संपूर्णपणे गेला नव्हता त्याचे म्युटेशन येतच आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंटने अमेरिकेत आतापर्यंत साडे तीनशे लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारताच्या अनेक भागात कोरोनाचे पेशंट वाढले आहेत. थायलंडमध्ये अमेरिकेसारखीच स्थिती आहे. परंतू जेथून कोरोनाची साथ सुरु झाली होती. त्या चीनमध्ये मात्र नेमकी काय स्थिती आहे. याचा उलगडा झालेला नाही.
देशभरात कोरोनाचे एका आठवड्यात एक हजाराहून अधिक रुग्ण झाले आहेत. कोरोनाचे केवळ आकडेच वाढलेले नाहीत तर कोरोनाने आतापर्यंत ७ जणांना मृत्यू झाला आहे.पण हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्या मृत्यूचे कारण नक्की कोरोना होते की अन्य कोणता आजार हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने नंतर थायलंडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. थायलंड येथे एकाच आठवड्यात ५० हून अधिक केसेस आल्या आहेत.
अमेरिकेत कोरोना आता जीवघातक बनला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेत ३५० जणांचा मृ्त्यू झाला आहे. ही संख्या जरी आधीच्या लाटेप्रमाणे जादा नसली तरी याने चिंता वाढत आहे.नवीन व्हेरिएंट NB.1.8.1 अमेरिकेसह आशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये पसरला आहे. संशोधकांच्या मते व्हेरिएंट वेगाने पसरतो मात्र याच्या गंभीरतेबाबत अजूनही संशोधन सुरु आहे.
अमेरिकेत केवळ २३ टक्के वयस्कांनीच अपडेटेड व्हॅक्सीन घेतली होती. मुलांमध्ये तर केवळ १३ टक्क्यांनी व्हॅक्सीन घेतली होती. व्हॅक्सीन न घेणे आणि कमजोर इम्युनिटी देखील यास कारणीभूत आहे. दोन्हींमुळे हा स्पाईक दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजारी लोकांमध्ये हा व्हायरसचा परिणाम जास्त आहे. त्यामुळे ६५ वर्षांवरील लोकांनी दर सहा महिन्यांनी ही व्हॅक्सीन घ्यायला हवी असा सल्ला दिला जात आहे.