
अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली जेफ्री एप्स्टीनला अटक करण्यात आली. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जेफ्री एपस्टीन हे दोन मुलींसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ खरा आहे की एआय आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो किचनमध्ये दोन महिलांसोबत दिसत आहे. आजूबाजूला काही महिला धावताना दिसतोय आणि सर्वजण हसताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये महिलांचा चेहरा ब्लर केला गेला आहे. तसेच त्यांचा त्या कोण आहेत हे दाखवलेले नाही. दुसऱ्या व्हिडीओमध्ये जेफ्री एपस्टीन एका महिलेसोबत नाचताना दिसतोय.
🚨 A newly released clip shows Epstein running around his kitchen with young women while he laughs like it’s some joke.
No context, but another deeply unsettling one.
It’s not shocking anymore. It’s dark and disturbing. pic.twitter.com/FM3lVGjBo6 https://t.co/fGHFCALpaM
— Mario Nawfal (@MarioNawfal) January 31, 2026
हे व्हिडीओ कसे समोर आले?
शुक्रवारी अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने जेफ्री एपस्टीनशी संबंधित सुमारे 30 लाख दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. यात हजारो व्हिडीओ, फोटो, एफबीआय इंटरव्ह्यू समरी आणि ईमेल यांचा समावेश आहे. याच दस्तऐवजांमधून हे व्हिडीओ समोर आला आहे. एपस्टीनचा संबंध अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक नेते आणि हस्तींशी (भारतातील काही नावांसह) जोडला गेला आहे.
A newly released clip shows Jeffrey Epstein dancing with a redacted girl pic.twitter.com/Stx47y5SQz
— grizzy (@Furbeti) January 31, 2026
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन १९७० मध्ये न्यूयॉर्कच्या डाल्टन स्कूलमध्ये शिक्षक होता. नंतर त्याने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःची कंपनी सुरू केली. त्याने मोठ्या क्लायंट्सची संपत्ती हाताळली. त्याने फ्लोरिडा, न्यू मेक्सिको आणि न्यूयॉर्कमध्ये आलिशान मालमत्ता विकत घेतल्या. त्याच्या पार्ट्यांमध्ये ट्रम्पसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती येत असत. २००५ मध्ये एका १४ वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली की, पाम बीचवरील त्याच्या घरात तिचे लैंगिक शोषण झाले. त्यानंतर छाप्यांमध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाला. अनेक पीडितांनी धक्कादायक साक्ष दिल्या. ६ जुलै २०१९ रोजी त्याला न्यूयॉर्क विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर शोषण आणि सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप होते. १० ऑगस्ट २०१९ रोजी जेलमधील सेलमध्ये त्याचा मृत्यू झाला.
या नव्या दस्तऐवज आणि व्हिडीओंमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.