
पृथ्वी ही मोठी चमत्कारिक आहे. पृथ्वीच्या पोटात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचे आकलन मानवाला अजूनही झालेले नाही. वैज्ञानिकांनी काही गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. परंतु यातील बऱ्याच गोष्टी नेमक्या का घडतात? हे मानवाला आजही समजू शकलेले नाही. आकाशात आणि भूगर्भात कधीही काहीही होऊ शकतं. दरम्यान, आता पृथ्वी आणि सूर्याचा एक अनोखा चमत्कार समोर आला आहे. पृथ्वीवरच्या एका ठिकाणी तब्बल 64 दिवस सूर्य उगवणारच नाही. म्हणजे त्या भागातील लोक तब्बल 64 दिवस अंधारातच राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या जवळ काही शहरं आहेत. याच भागात अमेरिकेच्या उत्तरेस वसलेले उटक्वियाग्विक (Utqiagvik) नावाचे एक शहर आहे. या शहरात 2025 सालाचा शेवटचा सूर्यास्त झाला आहे. आता येथे थेट पुढच्या वर्षी म्हणजेच थेट 22 जानेवार 2026 रोजी सुर्योदय होणार आहे. म्हणजेच या शहरात तब्बल 64 दिवसांनी पुन्हा सूर्य उगवणार आहे. तोपर्यंत या शहरात अंधार असेल. पृथ्वीची स्थिती आणि आर्क्टिक सर्कलच्या वर असल्यामुळे या शहरात आता सूर्य 64 दिवसांनी उगवणार आहे. तसं पाहायचं झालं तर इथे सूर्य उगवणार नसला तरी हे शहर पूर्णपणे अंधारात नसेल. या काळात तिथे नैसर्गिक निळ्या रंगाचा प्रकाश असतो. तसेच वीजदेखील असते. त्यामुळे याच निळा प्रकाश आणि वीज यांच्या मदतीने तेथील लोक आगामी दिवस काढणार आहेत.
या शहराची लोकसंख्या एकूण 4400 आहे. सूर्योदयच होणार नसल्यामुळे या काळात या तापमान वेगाने घसरते. सूर्य नसल्यामुळे पृथ्वीला मिळणारी उष्णता शून्यावर येते. त्यामुळे दीर्घकाळाच्या अंधारामुळे येथे कडाक्याची थंडी होती. गार हवादेखील वाढते.
दरम्यान या शहरात दरवर्षी ही प्रक्रिया घडते. ज्या पद्धतीने येथे 64 दिवस सूर्योदय होत नाही. त्याच पद्धतीने येथे उन्हाळ्यात साधारण तीन महिने सूर्य मावळतच नाही. उन्हाळ्यात येथील दैनंदीन जीवन पूर्णपणे बदलून जाते.