Jensen Huang: Nvideaच्या माजी CEOचा क्रुर चेहरा जगासमोर! कर्मचाऱ्यांनी असं काही सांगितलं; शॉकिंग रिपोर्ट
एनव्हिडियाच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचा आणि बैठकांमध्ये आपला राग अनावर झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनुसार हुआंग यांचा रागीट स्वभाव कंपनीत इतका सर्वज्ञात होता की, कर्मचारी त्यांच्यासमोर बोलणे टाळत असत.

Nvidia Former CEO Jensen Huang: अमेरिकन टेक कंपनी एनव्हिडियाचे माजी सीईओ, जेन्सन हुआंग त्यांच्या वादग्रस्त प्रेमप्रकरणामुळे सध्या चर्चेत आहेत. एका चिनी गुप्तहेर महिलेसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे हुआंग यांना त्यांच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा लागला. अशातच आता शांत संयमी दिसणाऱ्या जेन्सन हुआंग यांच्याबद्दल हादरवणारा रिपोर्ट समोर आला आहे. एनव्हिडियाच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचा आणि बैठकांमध्ये आपला राग अनावर झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनुसार हुआंग यांचा रागीट स्वभाव कंपनीत इतका सर्वज्ञात होता की, कर्मचारी त्यांच्यासमोर बोलणे टाळत असत.
Nvideaच्या माजी CEOचा क्रुर चेहरा, कर्मचाऱ्यांनी सांगितलं हादरवणारी स्टोरी
न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, हुआंग मिटिंगमध्ये वारंवार होणारे वाद अन् संतापामुळे ओळखले जात होते. हुआंग यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी भांडी घासणे आणि शौचालये साफ करणे यांसारखी कामे केली होती. मात्र न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालात, ज्यात कर्मचाऱ्याच्या आरोपांचा तपशील आहे, असा दावा करण्यात आला आहे की कंपनीमधील त्यांचे वर्तन खूपच वेगळे होते.
अहवालानुसार, सर्वात धक्कादायक घटना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घडली. जेव्हा ३० हून अधिक वरिष्ठ अधिकारी एका बैठकीत होते, तेव्हा हुआंगने कंपनीचे तत्कालीन कार्यकारी उपाध्यक्ष, जय पुरी यांच्यावर हुआंग यांनी हल्लाबोल केला. त्यांनी आधी पुरी हे आजारी आहेत असं सांगितले आणि त्यानंतर ते म्हणाले की त्यांनी मरावं म्हणजे बाकी सर्वांची सुटका होईल. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, या घटनेदरम्यान पुरी शांत बसले होते. बैठकीत उपस्थित असलेल्या इतरांच्या मते, हुआंग यांचे ओरडणे सामान्य होते, पण यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दांनी सर्वांना धक्का बसला.
वरिष्ठ अधिकाऱ्याचा अपमान, बॉटलही फेकली!
हुआंग यांच्या रागीट स्वभावा संबंधित इतर अनेक घटनाही समोर आल्या आहेत. अहवालानुसार, 2025 मध्ये सुमारे तीन तास चाललेल्या एका बैठकीदरम्यान, त्यांनी एका वरिष्ठ विक्री अधिकाऱ्यावर आपले काम समजत नसल्याचा आरोप करून त्याचा अपमान केला. त्यावेळी अंदाजे 40 कर्मचारी उपस्थित होते. दुसरीकडे एक वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले होते. . शिवाय, कंपनीच्या कॅलिफोर्निया मुख्यालयात एका बैठकीदरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर पाण्याची बाटली फेकल्याचा त्याच्यावर आरोप आहे.