AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दोन विमानांची धडक, 166 प्रवासी अन् 6 क्रू मेंबर्स असलेल्या विमानाचा मोठा अपघात

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन विमानांची धडक झाली आहे. अपघातग्रस्त विमानामध्ये 166 प्रवासी होते.

मोठी बातमी! दोन विमानांची धडक, 166 प्रवासी अन् 6 क्रू मेंबर्स असलेल्या विमानाचा मोठा अपघात
दोन विमानांचा अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 3:30 PM
Share

गेल्या काही दिवासांपासून सातत्याने विमान अपघाताच्या घटना घडतच आहेत. विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या वर्षी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालं होतं, मात्र उड्डान केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर कोसळलं, या विमानात 142 प्रवासी होते, त्यातील 141 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर देखील काही विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे 166 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स असलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. दोन विमानांची धडक झाली आहे.

हा अपघात अमेरिकेच्या मियामी एअरपोर्टवर झाला आहे. दोन विमानाची धडक झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी रात्री 9:15 वाजेच्या आसपास घडला आहे. कोपा एअरलाइन्सचं विमान बोइंग 737 विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे जात असतानाच हे विमान तिथेच असलेल्या एका कार्गो विमानाला धडकलं. हा अपघात मोठा होता, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या अपघातग्रस्त विमानामधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, फक्त दोन प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवाशांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा अमेरिकेमध्ये देशव्यापी ग्राउंड स्टॉप म्हणजेच सर्व विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली होती. अचानक सर्व विमानांची उड्डाण थांबवण्यात आल्यामुळे लाखो लोकं एअरपोर्टवरच अडकून पडले होते. त्यानंतर पाच तासांनी हळुहळु विमान उड्डाणं सुरू करण्यात आले, याचदरम्यान कोपा विमान तळावर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान या विमान अपघाताची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. या विमानाची धडक नेमकी कशी झाली? याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे. या विमानामधून 6 क्रू मेंबर्ससह 166 प्रवासी प्रवास करत होते.

Follow Us
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक