Aaryavir Sehwag : मी फक्त ‘सीताराम’ जप केला, मी फक्त ‘सीताराम’ जप केला, सगळे पाकिस्तानी…आर्यवीर सेहवागने सांगितलं भारत-पाकिस्तान सामन्यात काय घडलं?
अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर तीन धावा हव्या होत्या. यावेळी मोहित उल्वाने चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. भारताने 338 धावांचं लक्ष्य गाठलं. आर्यवीरने या स्पर्धेत दमदार फलंदाजी केली.

IND Vs Pak Final : अडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना ताणला गेला होता. दरम्यान, भारताने सामन्यात विजय मिळवताच टीम इंडियाचा भाग असलेल्या आर्यवीर सेहवागने आपले वडील माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांना व्हिडीओ कॉल करून सामन्यादरम्यानची सर्व हकिकत सांगितली. सामना सुरू असताना नेमकं काय घडत होतं? 2 हजार पाकिस्तानी प्रेक्षक ‘सेहवाग-सेहवाग’ असे नारे का लगावत होते, असं सगळं काही त्याने आपल्या वडिलांना सांगितलं. विशेष म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आर्यवीर सीताराम-सीताराम असा जप करत होता.
मी सीताराम-सीतारामचा जप करत होतो
सामना जिंकल्यानंतर आर्यवीर सेहवाग याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा खिताब मिळाला. त्याने संपूर्ण चषकात चांगली कामगिरी केल्याने, त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामना संपल्यानंतर आर्यवीरने विरेंद्र सेहवाग यांना कॉल केला. याच संभाषणाचा व्हिडीओ विरेंद्र सेहवाग यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये विजायाचा आनंद आर्यवीरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. ‘गेल्या एका तासापासून मी बसून सीताराम-सीताराम असा जप करत होतो. मला लागल्यानंतर दोन ते तीन वेळी फिजिओथेरेपिस्ट आला. यावेळी दोन हजार पाकिस्तानी फॅन्स सेहवाग-सेहवाग अशा घोषणा देत होते. हे ऐकून तर मी हैराण झालो,’ अशा भावना आर्यवीरने व्यक्त केल्या. सामना खेळताना मला खूप मजा आली, हे सांगायलाही आर्यवीर विसरला नाही.
View this post on Instagram
आर्यवीरची दमदार फलंदाजी, भारताला तारलं
दरम्यान, अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर तीन धावा हव्या होत्या. यावेळी मोहित उल्वाने चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. भारताने 338 धावांचं लक्ष्य गाठलं. आर्यवीरने या स्पर्धेत दमदार फलंदाजी केली. त्याने 90.25 च्या सरासरीने 361 धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं लगावली. म्हणूनच त्याला प्लेयर ऑफ टुर्नामेंटने सन्मानित करण्यात आले. आर्यवीरने पाकिस्तानविरोधातील अंतिम सामन्यातही 61 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. त्याने केलेल्या खेळीमुळे भारताला विजयापर्यंत पोहोचायला मदत झाली.
