AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : लोक म्हणतात ती बाई… मनोज जरांगेंचा मोठा दावा, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल नवी माहिती

manoj jarange patil on eknath shinde : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या वादावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. या प्रकरणात शिंदे यांनी गप्प न बसता सत्य बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आपल्याकडे या प्रकरणासंदर्भात आणखी माहिती असल्याचा दावाही जरांगे यांनी केला आहे.

Manoj Jarange : लोक म्हणतात ती बाई... मनोज जरांगेंचा मोठा दावा, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल नवी माहिती
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 3:17 PM
Share

तुमच्यामुळे त्यांचं आहे. त्यांच्यामुळं तुमचं नाही, मग तुम्ही का गप बसला आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, तुम्ही घेतलेच नाही तर तुम्ही का घाबरता, आपल्यासंबंधी त्याठिकाणी विषारी षडयंत्र रचलं जात असेल तर त्याठिकाणी आपण नाही का रहावं असा सल्ला त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

तुम्ही जर हे सोडून द्याल, तर मग आणखी पुढेही काही प्लान्स आणि किती प्लान असतील हे तुम्हाला माहिती आहे का मग? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मला माझ्याबद्दल माहिती आहे, माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळं आहे. वेळ आली की फोडणार, असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

ही ऑडिओ क्लिप खरी आहे. दोघांनी तुटून पडून यातलं सत्य बाहेर काढलं पाहिजे, लोकांमध्ये शिंदे साहेबांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालं पाहिजे. ही क्लिप काही एआय नाही, ही खरी आहे. ही खोटी नसण्याचं कारण आहे, ते म्हणजे याच्यामध्ये कोणी गरीब असते तर ते आतापर्यंत जेलमध्ये टाकले गेले असते. ते भाजपाच्यासंबंधीत आहेत. म्हणून ते जेलमध्ये टाकलेले नाहीत, गुन्हाच दाखल नाही. ही देशातली आमि राज्यातली पहिली एसआयटी अशी आहे की, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चौकशीला सुरुवात केली आहे, असं होत नाही. याचा अर्थ ते ही क्लिप खोटी ठरवणार आहेत. हा विषय लहान नाही. शिंदेंनी हा विषय किती गांभिर्यानं घेतला याची आम्हाला कल्पना नाही, पण याचे पडसाद आणि भोग भोगावे लागणार आहेत. जर हे त्याच्या मुळाशी गेले नाहीत. तर त्याचे परिणाम मात्र तळागाळातल्या, गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत, असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी शिंदेंना दिला आहे.

हसण्यावारी विषय नेला तर लहानांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचं राजकीय करिअर हळूहळू उद्ध्वस्त होईल. मला दुसरीही एक माहिती मिळाली आहे, दिल्लीतले लोक म्हणतात की, ती बाई खोटं नाही बोलू शकतं. ती बाई खूप आत्मविश्वासाने क्लिपमध्ये बोलते आहे, असंही यावेळी जरांगेंनी म्हटलं आहे.

Follow Us
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....