Donald Trump : रागात शिवी घालून ट्रम्प यांच्याकडून मोठी चूक, या नियमामुळे राष्ट्रपतीपद आलं धोक्यात

Donald Trump : सोशल मीडियावर पोस्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला. त्यांनी चक्क नको ते शब्द वापरले, शिवी घातली. हे सगळं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगाशी येऊ शकतं. अमेरिकेत एक नियम आहे, त्यामुळे ते वाईट पद्धतीने अडकू शकतात. त्यांची राष्ट्रपती पदाची खुर्ची सुद्धा जाऊ शकते.

Donald Trump : रागात शिवी घालून ट्रम्प यांच्याकडून मोठी चूक, या नियमामुळे राष्ट्रपतीपद आलं धोक्यात
Donald Trump
Image Credit source: white house
| Updated on: Apr 06, 2026 | 12:41 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धामुळे चांगलेच हैराण झालेत. त्यांना या युद्धातून बाहेर पडायचय पण इराण ऐकत नाहीय. ट्रम्प वारंवार त्यांची वक्तव्य बदलत असतात यातून त्यांची हताशा दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करताना इराणबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यामुळे अमेरिकेतील विरोधी पक्षाचे खासदार त्यांच्यावर भडकले आहेत. इराण विरुद्ध अपशब्द बोलून डोनाल्ड ट्रम्प वाईट पद्धतीने अडकले आहेत. अमेरिकेत विरोधी पक्षाच्या खासदारांकडून त्यांच्याविरोधात 25 व्या संशोधनातंर्गत अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आतापर्यंत पाच खासदारांनी ट्रम्प यांना पदावरुन हटवण्यासाठी या कायद्याचा वापर करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प आपली कर्तव्य निभावण्यासाठी सक्षम नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना खुर्चीवरुन हटवणं हा एकमात्र पर्याय आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हटवण्यासंदर्भात 25 व्या संशोधनात विस्ताराने माहिती देण्यात आली आहे. या कायद्यातंर्गत राष्ट्रपतींना हटवलं, तर त्यांच्याजागी उपराष्ट्रपती उर्वरित काळासाठी पदभार संभाळतात. “ओबामा किंवा बायडेन अशा पद्धतीने बोलले असते तर रिपब्लिकन्सनी काय केलं असतं?. सर्वांनी त्यांना हटवण्याची मागणी केली असती. मग,मी सुद्धा ट्रम्प यांना हटवण्याची मागणी करते” असं यूएस स्टेट रिप्रजेंटेटिव बेक्का बालिंट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘राष्ट्रपती ट्रम्प वेडे झालेत’

“मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो तर 25 वं संशोधन लागू करण्यासाठी वकिलांशी बोललो असतो. ट्रम्प लोकांची हत्या करत आहेत” असं सीनेटर क्रिस मर्फी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलय. काँग्रेस सदस्य यास्मीन अंसारी यांनी आपल्या पोस्टमध्ये “राष्ट्रपती ट्रम्प वेडे झालेत. त्यांच्याविरुद्ध प्रस्ताव आणण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण ट्रम्प यांच्यामुळे सर्व जग धोक्यात आहे” असं लिहिलय.

25 व्या संशोधनातंर्गत कायदा काय?

अमेरिकेत राष्ट्रपतींना पदावरुन हटवण्यासाठी 25 व्या संशोधनातंर्गत एका कायदा तयार करण्यात आला होता. यात राष्ट्रपतींचा अचानक मृत्यू झाल्यास किंवा ते जबाबदारीचं वहन करण्यात असमर्थ ठरल्यास पर्याय सांगितला आहे. राष्ट्रपती पदावरुन गेल्यानंतर उपराष्ट्रपती उर्वरित काळ ती जबाबदारी संभाळतो. या कायदा अमलात आणण्यासाठी आधी कॅबिनेटला एक प्रस्ताव आणावा लागतो. राष्ट्रपतींनी त्या प्रस्तावाला विरोध केल्यास हा प्रस्ताव संसदेत नेला जातो. सिनेट आणि काँग्रेसने दोन तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्यास राष्ट्रपतीला खुर्ची सोडावी लागते. ट्रम्प इराण विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करुन तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत.

 

Follow Us