AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणची भूमी, चारही बाजूने IRGC ने घेरलेलं, या स्थितीत US कमांडोजनी वैमानिकाला कसं वाचवलं? थरारक मिशनचे 36 तास

US Pilot Rescue Mission : इराणच्या भूमीमध्ये असलेल्या वैमानिकाला काहीही करुन सुरक्षित बाहेर काढणं अमेरिकेसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. अमेरिकेने सुद्धा या मिशनमध्ये आपली सर्वोच्च लष्करी क्षमता दाखवून दिली. जगाला आपल्या युद्ध कौशल्याचं दर्शन घडवत वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढलं.

इराणची भूमी, चारही बाजूने IRGC ने घेरलेलं, या स्थितीत US कमांडोजनी वैमानिकाला कसं वाचवलं? थरारक मिशनचे 36 तास
US Navy SealImage Credit source: Getty Images
| Updated on: Apr 06, 2026 | 9:24 AM
Share

इराण युद्ध सुरु झाल्यापासून रणनितीक यशासाठी झगडणाऱ्या अमेरिकेसाठी रविवारचा दिवस थोडा समाधानकारक ठरला. इराण युद्ध सुरु करताना अमेरिकेची दोन महत्वाची उद्दिष्ट्य होती. एक म्हणजे रेजींम चेंज सत्ता बदल आणि दुसरं इराणची अणवस्त्र बनवण्याची क्षमता नष्ट करणं. अमेरिकेला अजूनपर्यंत तरी ही दोन्ही उद्दिष्ट्य साध्या करता आलेली नाही. उलट अमेरिका-इस्रायलच्या प्रत्येक हल्ल्याला इराणकडून जशास तस उत्तर मिळतय. त्यात 3 एप्रिलला इराणने अमेरिकेला एक मोठा झटका दिला. इराणने अमेरिकेचं अत्याधुनिक F-15 फायटर जेट आपल्या हवाई हद्दीत पाडलं. या विमानात दोन जण होते, एक वैमानिक आणि दुसरा वेपन सिस्टिम ऑफिसर. विमान कोसळताच दोघांनी लगेच इजेक्ट केलं. म्हणजे विमानातून बाहेर पडले.

पण हे विमान इराणच्या हवाई हद्दीत कोसळलं होतं. दोन्ही वैमानिक इराणच्या हद्दीत होते. त्यातला एक जण जवळपास 36 तास इराणच्या हद्दीत होता. या वैमानिकाला शोधून काढण्यासाठी अमेरिकेने आपली ताकद पणाला लावली. कारण हा वैमानिक जर इराणच्या हाती लागला असता तर ती अमेरिकेसाठी मोठी नामुष्की ठरली असती. या पायलटच्या मोबदल्यात इराणने डीलचा खेळ खेळला असता. त्याशिवाय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मायदेशात वातावरण आणखी तापलं असतं.

मिशन कुठल्या हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही

इराणमध्ये जाग्रोस पर्वत रांगा आहेत. तिथे जवळपास 7000 फूट उंचावरील दुर्गम डोंगररांगांमध्ये अमेरिकन एअर फोर्सचा हा जवान मदतीच्या प्रतिक्षेत होता. त्याला वाचवण्यासाठी अमेरिकेने जे थरारक मिशन राबवलं, ते कुठल्या हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. उद्या यावर एखादा चित्रपट आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. इराणने आपल्या सरकारी चॅनल आणि अन्य माध्यमातून जो कोणी या अमेरिकी जवानाला शोधून काढेल किंवा त्याचं लोकेशन सांगेल त्याला घसघशीत इनाम देण्याची घोषणा केली होती. अमेरिकेसाठी हे सर्वात चॅलेंजिंग, डेअरिंग मिशन होतं.

CIA चा रोल सुद्धा महत्वाचा, त्यांनी काय केलं?

कारण ज्या भूप्रदेशातून वैमानिकाला सहीसलामत बाहेर काढायचं होतं, तो इराणच्या ताब्यात होता. इराणच्या सुरक्षा पथकांनी चारही बाजूंनी घेराव घातला होता. अशावेळी अमेरिकेच्या एलिट फोर्सेसनी आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढलं. अमेरिकी जवानाच्या सुटकेचं हे मिशन जवळपास 36 तास चाललं. यात अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेससह अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA सुद्धा सहभागी होती. सीआयएने सुद्धा या मिशनमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी दिशाभूल करणारं एक भ्रम पसरवणारं अभियान चालवलं. इराणी सुरक्षा पथकांची दिशाभूल हा CIA चा उद्देश होता.

इराणी सैन्य मागे लागलेलं

स्पेशल फोर्सने वैमानिकाची लगेच सुटका केली. पण या दरम्यान रेस्क्यू युनिटवर हल्ले झाले. एका ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरच नुकसान झालं. दुसरा जवान जवळपास 36 तास दुर्गम डोंगररागांमध्ये लपून बसलेला. जाग्रोसच्या पर्वतांमध्ये इराणी सैन्यापासून स्वत:ला वाचवत होता. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि बसीज फोर्सने या वैमानिकाला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली. अमेरिकन कमांडो युनिट आणि त्या जवानाच्या मागे इराणी सैन्य लागलेलं. इतक्या कठीण परिस्थितीतून त्या वैमानिकाला बाहेर काढणं आव्हानात्मक होतं.

काय खोटी माहिती पसरवली?

इराणच्या भूमीवर असलेल्या जवानाने सिक्योर एन्क्रिप्टेड डिवाइसद्वारे आपल्या लोकेशनची अमेरिकी सैन्याला माहिती दिली. या दरम्यान सीआयएने वैमानिक हाती लागलय अशी खोटी माहिती पसरवली. त्याला जमिनीवरुन बाहेर काढण्यात येतय असं सगळीकडे पसरवलं. जेणेकरुन इराणी सैन्याचं लोकेशनवरुन लक्ष हटेल. सीआयएने फसलेल्या जवानाची अचूक लोकेशन शोधून कोऑर्डिनेट्स पेंटागन आणि व्हाइट हाऊसला पाठवले.

दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर शनिवारी रात्री स्पेशल फोर्सने ऑपरेशन सुरु केलं. A-10 वॉरथॉग विमान आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरकडून कवर फायर देण्यात आली. डोंगररागांच्या दिशेने येणाऱ्या इराणी पथकांना रोखण्यासाठी अमेरिकन एअर फोर्सने हवाई हल्ले केले. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु होता. अखेर स्पेशल फोर्सचे कमांडो या अमेरिकी जवानापर्यंत पोहोचले व त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?