AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केला त्या अपशब्दांचा वापर, मोठी खळबळ, मानसिक आरोग्यावरच…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील याचा अजिबात भरोसा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना अपशब्दांचा वापर केला. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच जोरदार टीका होताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडल्याचे बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केला त्या अपशब्दांचा वापर, मोठी खळबळ, मानसिक आरोग्यावरच...
Donald Trump
| Updated on: Apr 06, 2026 | 8:48 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चिंता निर्माण झाली. डोनाल्ड ट्रम्प सतत जगातील देशांना धमक्या देत आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या विधानानंतर सर्वांची चिंता वाढली आहे. विशेष करून अमेरिकेची चिंता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणला इशारा दिला आणि यावेळी त्यांनी अपशब्दांचा वापर केला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी अशाप्रकारे अपशब्दांचा वापर करणे कोणालाही पटले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणमध्ये मंगळवारी पावर प्लॉट आणि ब्रिज डे होईल. होर्मुज खाडी खुली करा.. नाही तर नरकात जा.. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी चुकीचे शब्द वापरले. एका देशाच्या अध्यक्षाकडून अशा शब्दाची अपेक्षा अजिबातच केली जात नाही.

अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. यामुळे याचा परिणाम थेट जागतिक बाजारपेठेत बघायला मिळाला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सतत होर्मुज खाडी खुली करण्याबद्दल मोठ्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी होर्मुज खाडी खुली करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी खुली करण्याकरिता काही देशांकडे मदत मागितली.

पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही. होर्मुज खाडीचा फास डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्याला येऊन बसला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे अमेरिकेतूनही टीका होत आहे. सीनेट सदस्य आणि डेमोक्रेटिक पार्टीचे वरिष्ठ नेते चक शूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, एका असंतुलित व्यक्तीची बकवास आहे.

त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाला थेट बकवास म्हणते त्यांनी असंतुलित म्हटले. अमेरिकेचे सिनेटर बर्नी सँडर्स यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल वापरलेल्या शब्दांनंतर त्यांच्यावर टीका करत अनेकांनी थेटपणे मानसिकदृष्ट्या डोनाल्ड ट्रम्प असंतुलित व्यक्ती असल्याचे म्हटले. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली नाही तर डोनाल्ड ट्रम्प काय पाऊस उचलणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.