अमेरिकेत मोठी खळबळ, बँकिंग सेवांचे वाजले तीनतेरा, थेट युनायटेड..

पुन्हा अमेरिकेतून मोठी बातमी पुढे येत आहे. अमेरिकेच्या पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रणालींवर संकटाची टांगती तलवार सतत दिसत आहे. ऑनलाईन पेमेंट सेवा ठप्प झाली. अनेक ग्राहकांना व्यवहार करता येत नाहीत.

अमेरिकेत मोठी खळबळ, बँकिंग सेवांचे वाजले तीनतेरा, थेट युनायटेड..
US
| Updated on: Nov 17, 2026 | 8:27 AM

अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच विमानसेवा ठप्प झाली होती. पूर्ण अमेरिकेतील विमान उड्डाणे काही तासांसाठी थांबवण्यात आली होती. अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, अमेरिकेकडून सांगण्यात आले की, तांत्रिक बिघाडामुळे विमान सेवा थांबवण्यात आली. आता पुन्हा अमेरिकेतून मोठी बातमी पुढे येत आहे. अमेरिकेच्या पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रणालींवर संकटाची टांगती तलवार सतत दिसत आहे. हवाई वाहतुकीत निर्माण झालेला व्यत्यय आणि मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीत आलेली तांत्रिक बिघाड यामुळे जगात खळबळ उडाली. अमेरिकेला मोठा धक्का बसला. जगभरातील मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीमध्ये बिघाड झाला.

त्यातच आता अमेरिकेतील काही मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवाही बंद पडल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करता येत नाहीये. अमेरिकेत जवळपास लोक ऑनलाईन व्यवहार करतात पण ऑनलाईन सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, युनायटेड एअरलाईन्सच्या प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

विमान प्रवाशांच्या अडचणींत पुन्हा एकदा भर पडली आहे. कारण पूर्णपणे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाली आहेत. सोमवारी अमेरिकेतील अनेक प्रमुख बँकांच्या ग्राहकांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांमध्ये प्रवेश करता येत नव्हता. व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचा ऑनलाईन व्यवहार होत नव्हता. शॉपिंग केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट होत नव्हते. प्रमुख बँकांच्या ग्राहकांना ही समस्या आली.

बँक ऑफ अमेरिका, चेस, जेपी मॉर्गन, यू.एस. बँक, वेल्स फार्गो आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म झेलेच्या वापरकर्त्यांनी सेवांमध्ये व्यत्यय आला. अमेरिकेत एका मागून एक संकटे येताना दिसत आहेत. अमेरिकेवर सायबर हल्ला झाल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. पण अमेरिकेने हा दावा खोटा असल्याचे म्हटले. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या जेपीमॉर्गन चेसच्या अंतर्गत हार्डवेअर प्रणालीमध्ये सॉफ्टवेअर त्रुटी निर्माण झाल्यामुळे व्यवहारांमध्ये विलंब झाला. काही काळ सेवा ठप्प होती. अमेरिकेत नक्की काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us