AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्ताननंतर वाढले चीनचे टेन्शन, भारताचा मास्टर शॉट, थेट भारतीय सैन्य…

त्रिशूल लष्करी सरावामुळे पाकिस्तान आधीच हादरला आहे. त्यामध्येच आता भारताने 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये 'पूर्वी प्रचंड प्रहार' नावाचा युद्ध सराव आयोजित केला जाईल.

पाकिस्ताननंतर वाढले चीनचे टेन्शन, भारताचा मास्टर शॉट, थेट भारतीय सैन्य...
Indian Army
| Updated on: Nov 04, 2025 | 4:28 PM
Share

सध्या फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच नाही तर संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण बघायला मिळतंय. चीन, पाकिस्तान यांच्यासह उत्तर कोरिया देखील अण्वस्त्र चाचण्यांचे परीक्षण करत आहे. अमेरिकेने याबद्दलचा खुलासा केला. भारताच्या शेजारील दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्यांचे परीक्षण करत असल्याने भारताने सावध भूमिका घेतली. भारतानेही हालचाली सुरू केल्या आहेत. चीनने चांगलाच धसका घेतला. पश्चिमेकडील देशांच्या पाठोपाठ भारतीय लष्कराने सेना, हवाई दल आणि नौदल आता पूर्व सीमेवर सराव करणार आहेत. “त्रिशूल” लष्करी सरावामुळे पाकिस्तान आधीच हादरला आहे. 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ नावाचा युद्ध सराव आयोजित केला जाईल.

या युद्ध सरावात भारताचे तिन्ही दल असतील, याचाच धसका पाकिस्तानह चीनने घेतला. तोफखाना, यांत्रिक युनिट्स, ड्रोन आणि अचूक हवाई हल्ले या सर्वांचा अभ्यास होईल.हवाई देखरेख आणि लॉजिस्टिक सपोर्टद्वारे नौदल देखील या जमिनीवर आधारित सरावात सहभागी होईल. या युद्ध सरावाबद्दलची सविस्तर माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली. या सरावाचे मुख्य वैशिष्ट्य विशेष दल आहे.

पूर्वी प्रचंड प्रहार सुरू होण्याच्या अगोदर भारतीय सैन्य पश्चिम सीमेवर त्रिशूल सराव करतंय. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर होणाऱ्या या सरावात लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या तुकड्यांचा समावेश असणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्य रशियात देखील युद्ध सराव करण्यासाठी गेले होते. आता हा भारतीय सैन्याचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, एकात्मिक युद्धभूमी संप्रेषण प्रणालींची चाचणी घेणे ही मुख्य उद्धिष्ट आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या सरावात भारतीय हवाई दलाचे लढाऊ आणि वाहतूक विमाने लष्कराच्या स्ट्राइक फॉर्मेशन्ससह एकत्रितपणे कार्यरत असणार आहेत. अमेरिकेने दावा केला की, पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, आता भारताच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारत देखील अण्वस्त्र चाचणी करणार का? यावर लवकरच भारताकडून प्रतिक्रिया येईल.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...