
ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सैन्य कारवाई करताना 9 दहशतवादी तळ उडवून दिले. त्यानंतर पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना त्यांचे 11 एअरबेस उडवले. भारताचा एअर डिफेन्स आणि सैन्य पराक्रमासमोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तान या मानहानीकारक पराभवानंतर नवीन शस्त्रांसाठी अमेरिकेला विनवण्या करत आहे.
पाकिस्तानच्या 13 सदस्यीय प्रतिनिधिमंडळाने वॉशिंग्टनमध्ये सार्वजनिकरित्या अत्याधुनिक अमेरिकी शस्त्रांची मागणी केली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मलिक यांनी अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टिम आणि फायटर विमानांची मागणी केली आहे. आम्ही तुमच्याकडून ही शस्त्र खरेदी करु असं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानातील शहबाज आणि मुनीर सरकार आपली सरशी झाल्याची दवंडी पिटत आहेत. पण हा कबूलनामा पाकिस्तानची पोल-खोल करण्यासाठी पुरेसा आहे.
त्यात 400 मिसाइल्स होती
“भारत 80 विमानांसोबत आला होता. त्यात 400 मिसाइल्स होती. काही मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम होती. तुम्ही पाहिलं असेल, आमच्यासोबत काय झालं?. आमच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नसती, तर आम्ही ढिगाऱ्याखाली दबलो गेलो असतो. भारताने जी टेक्नोलॉजी वापरली ती खूप Advance आहे. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय की, टेक्नोलॉजी आम्हाला द्या, आम्ही विकत घेऊ” असं पाकिस्तानी मंत्री मलिक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बोलताना दिसतायत.
भारताची नक्कल केली
मलिक पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. सध्या ते अमेरिकेत अधिकारी आणि खासदारांशी बोलत आहेत. पाकिस्तानने सुद्धा भारताची नक्कल करताना बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवलं आहे.
⚡ Pakistani delegation in the US is begging the US to provide them with air defence systems and fighter jets so that they can escape from the Indian aircraft which have advanced technology and which have destroyed their airbases. pic.twitter.com/d5naqTvgSr
— OSINT Updates (@OsintUpdates) June 7, 2025
मलिक यांचं वक्तव्य शहबाज शरीफ यांच्या उलट
पाकिस्तानी मंत्री मलिक यांचं हे वक्तव्य पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या देशांतर्गत वक्तव्याच्या बिलकुल उलट आहे. मलिक मदत मागत आहेत. शरीफ पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्धच्या संघर्षात आपण कसे वरचढ ठरलो, हे खोट सांगत आहेत. पाकिस्तानने त्यापुढे एक पाऊल टाकत हरल्यानंतर लष्कर प्रमुख असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर प्रमोट केलय.