AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Nuclear Program : पाकिस्तानचं सिक्रेट मिशन, भारतासह जग संकटात; बोगद्यात सुरू आहे…हादरवणारी माहिती समोर!

पाकिस्तानमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे पाकिस्तान जमिनीखाली मोठं कारस्थान रचत आहे. हे कारस्थान त्यांच्याच नागरिकांनी समोर आणले आहे.

Pakistan Nuclear Program : पाकिस्तानचं सिक्रेट मिशन, भारतासह जग संकटात; बोगद्यात सुरू आहे...हादरवणारी माहिती समोर!
pakistan bunker atomic program
| Updated on: Nov 05, 2025 | 6:20 PM
Share

पाकिस्तान हा असा देश आहे, जो नेमहीच काहीतरी कुरापत्या करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान हा देश लपून-छपून अणुचाचण्या करत आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. असे असतानाच आता सिंधी नागरिक समाजाच्या काही संस्थांनी तसेच सिंधुदेश आंदोलनाच्या संयुक्त मंचाने पाकिस्तानच्या सिंध तसेच पर्वतीय क्षेत्रात कथित गुप्त अण्विक कार्यक्रम चालू असल्याचा दावा केला असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या कथित आण्विक कार्यक्रमाच्या हालचालींची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पाकिस्तानातून समोर आले पत्र, नेमका आरोप काय?

सिंधी नागरिक समाजाच्या संघटना आणि सिंधुदेश आंदोलनाच्या संयुक्त मंचाने संयुक्त राष्ट्र महासचिव, अंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा एजन्सी (आईएईए), संयुक्त राष्ट्राचे निशस्त्रीकरण कार्यालय तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालय (ओएचसीएचआर) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात पाकिस्तानातील जमशोरोच्या उत्तरेस नोरियाबादजवळ, कंबर-शाहदाकोट जिल्ह्याच्या जवळपास, मंचर तलावाच्या पश्चिमेकडील नोरियाबादजवळ अनेक भूमीगत बोगद्यांची तसेच चेंबर्सची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला आहे. हे पत्र जेय सिंध मुत्तहिदा महाज संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट केले आहे.

चेंबरचा उपयोग नेमका कशासाठी केला जातोय

या पत्रात पाकिस्ताविषयी खळबळजनक खुलासे आणि दावे करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी हे बोगदे आणि चेंबर तयार करण्यात आले आहेत, तिथे सैनिकांचा कडक पहारा आहे. या भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे. या बोगद्यांचा तसेच चेंबरचा उपयोग आण्विक सामान, उपकरणांना ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. या बोगद्यात आण्विक पदार्थ, सामग्री असेल तर यामुळे रेडिओथर्मी प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश, जागतिक आण्विक सुरक्षा आणि प्रसारबंदीच्या नियमांचे उल्लंघ होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे.

जगभरात उडाली खळबळ, पाकिस्तान काय स्पष्टीकरण देणार?

सोबतच या बोगद्यांमध्ये तसेच बंकरमध्ये नेमके काय चालू आहे, याची लवकरात लवकर तपासणी केली जावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्राचा तणावाची स्थिती निर्माण करण्याचा उद्देश नाही. तर पारदर्शकता वाढावी तसेच तेथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही हे पत्र लिहित आहोत, अशी भूमिका या पत्रात स्पष्ट करण्यात आलेली आहे. दरम्यान, आता या पत्रानंतर जगभरात एकच खळबळ उडाली असून पाकिस्तान यावर नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार? तसेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या कथित आण्विक कार्यक्रमाचा भारताला काय धोका असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी