AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान पुन्हा हादरले, निसर्गाने धारण केला रुद्रावतार, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला असून गेल्या आठवड्यात हा तिसरा भूकंप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा भूकंप चिंतेचा विषय ठरला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या जवळ असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान पुन्हा हादरले, निसर्गाने धारण केला रुद्रावतार, नेमकं काय घडलं?
pakistan earthquake
| Updated on: May 12, 2025 | 4:47 PM
Share

भारत आणि पाकिस्तानात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तानात युद्धसदृश्य परिस्थिती असताना दुसरीकडे निसर्गही पाकिस्तानवर कोपल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याची तीव्रता ४.६ रिस्टेल स्केल इतकी होती. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंप आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे.

भूकंपाचे तीव्र धक्के

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 4.6 रिस्टेल स्केल इतकी होती. तर खोली 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यापूर्वी सोमवारी (5 मे) पाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, हा भूकंप जमिनीपासून केवळ 10 किलोमीटरवर झाला होता. त्यामुळे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते.

मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भूकंप येत आहेत. हे सर्व भूकंप 70 किलोमीटरपेक्षा कमी खोल होते. त्यामुळे या भूकंपामुळे अधिक प्रमाणात नुकसान होते. जमिनीपासून केवळ १० किलोमीटर खाली भूकंपीय लहरी जाणवतात. त्यामुळे भूकंपाचे केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणी तीव्र कंपने जाणवतात. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

बलुचिस्तान नेमकं कुठे आहे?

पाकिस्तानातील बलुचिस्तान हे एक केंद्रशासित क्षेत्र आहे. खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रांत इराणी पठारावरील युरेशियन प्लेटच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर वसलेले आहेत. तर सिंध, पंजाब आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जम्मू आणि काश्मीर प्रांत दक्षिण आशियामध्ये भारतीय प्लेटच्या उत्तर-पश्चिम टोकाला आहे. यामुळे, हा संपूर्ण प्रदेश भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. कारण येथे दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात.

Follow Us
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश