AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर रात्री इमरान खान यांना तुरुंगातून काढून थेट….पाकिस्तानातून खळबळ उडवणारी माहिती समोर!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांना रात्री दोन वाजता तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भर रात्री इमरान खान यांना तुरुंगातून काढून थेट....पाकिस्तानातून खळबळ उडवणारी माहिती समोर!
imran khan hospitalisedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 4:29 PM
Share

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान गेल्या तीन वर्षांपासून तुरूंगात आहेत. त्यांना कोणाशीही भेटू दिले जात नसल्याचे आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून पाकिस्तानी सरकारकडून त्यांचा छळ केला जातोय, असा दावा केला जातोय. इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए पार्टी अर्थात पीटीआय या पक्षाकडून पाकिस्तानात आंदोलनही केले जात आहे. असे असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा दोन वेजानंतर इमरान खान यांना गुपचूप रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती समोर येताच आता पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

नेमकी कोणती माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार इमरान खान यांना डॉक्टर तसेच वकिलांनाही भेटू दिले जात नाहीये. असे असतानाच सोमवारच्या रात्री उशिरा इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार करण्यात आला. इमरान खान यांना डोळ्यासंबंधीचा त्रास होत आहे. त्यांना एकूण तीन इंजेक्नशन दिले जाणार आहेत.आता नुकते त्यांना दुसरे इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यांच्या एका डोळ्याची फक्त 15 टक्केच दृष्टी शाबूत राहिली आहे, असे सांगण्यात येत आहे.

कोणालाही कळू न देता…

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 24 मार्च रोजी इमरान खान यांना तिसरे इंजेक्शन देण्यात येईल. इमरान खान यांना रात्री दोन वाजता रुग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पीटीआय पक्षाने सरकारवर आक्षेप घेतला आहे. कोणलाही न कळू देता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते का? असा सवाल पीटीआय पक्षाचे बॅरिस्टर गोहर खान यांनी केला आहे. तसेच इमरान खान यांचे नातेवाईक रुग्णालयात उपस्थित असतानाच त्यांच्यावर उपचार करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

बहिणीने घेतला आक्षेप

दरम्यान, इमरान खान यांच्यावरील उपचाराची माहिती समोर येताच त्यांच्या बहिणींनी पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्हाला सरकारवर विश्वास नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...