जगावर मोठं संकट! आता भयंकर युद्ध होणार, पाकिस्तानच्या थेट धमकीने खळबळ
पाकिस्तान हा देश नेहमीच काहीतरी कुभांड रचत असतो. सध्या या देशाने थेट युद्ध करण्याची मोठी धकमी दिली आहे. यामुळे आता तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Pakistan Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते. यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले. दरम्यान, हा वाद संपवण्यासाठी तसेच व्यापार आणि अन्य बाबी सुरळीत होण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये इस्तानबूल येथे चर्चेची नवी फेरी होणार आहे. पण त्याआधीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी अफगाणिस्तानला थेट धमकी दिली आहे. या धमकीमुळे आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे शांततेसाठी चर्चा होत असताना दुसरीकडे आसीफ यांनी धमकावणारे विधान केल्याने चिंता वाढली आहे.
नेमकं काय म्हणाले ख्वाजा आसीफ?
पाकिस्तानेच संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांना तेथील पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. अफगाणिस्तान आणि तालिबान यांना थांबवायचे असेल तर सैन्याची लडाई हा एकच पर्याय आहे का? असा सवाल आसीफ यांनी करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी युद्ध होणार? असे दोन शब्दांत उत्तर दिले. आसीफ यांनी अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आसारा देत आहे. हेच दहशतवादी नंतर पाकिस्तानवर हल्ले करत आहेत? असा दावाही आसीफ यांनी केला. अलिकडे पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांमागे तहरिक ए तालिबान पाकिस्तान ही संघटना जबादबदार असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातो. 2021 साली अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली. तेव्हापासूनच या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानमध्ये आसरा देण्यात आला, असे पाकिस्तानचे मत आहे. तर आम्ही कोणत्याही दहशतवादी संघटनेला पोसलेलं नाही. पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आमच्या जमिनीचा वापर केला जात नाही, असेही या देशाकडून सांगितले जाते.
इस्तानबूल बैठकीआधीच धमकी
इस्तानबूल येथे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात बैठक होणार आहे. याआधीच्या बैठकीत दोन्ही देशांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून युद्धविराम कायम राहील असे सांगितले होते. आता लवकरच या दोन्ही देशांत चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमक काय काय होणार? ख्वाजा आसीफ यांनी दिलेल्या धमकीचे पडसाद या बैठकीत दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
