AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Mission Sea Sultan : युद्ध सुरु असताना पाकिस्तानचा मोठा डाव, भारतीय नौदलाविरुद्ध सुरु केलं ‘मिशन सी सुल्तान’

Pakistan Mission Sea Sultan : सध्या मध्य पूर्वेत इराण विरुद्ध भीषण युद्ध सुरु आहे. याच दरम्यान पाकिस्तानी नौदलाने भारताविरोधात 'मिशन सी सुल्तान' लॉन्च केलं आहे. हे मिशन नेमकं काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? जाणून घ्या.

Pakistan Mission Sea Sultan : युद्ध सुरु असताना पाकिस्तानचा मोठा डाव, भारतीय नौदलाविरुद्ध सुरु केलं 'मिशन सी सुल्तान'
Pakistan Navy
| Updated on: Apr 01, 2026 | 8:55 AM
Share

पाकिस्तानने भारतीय नौदलाविरोधात मिशन सी सुल्तान लॉन्च केलं आहे. त्यासाठी पाकिस्तानी नौदलाने लॉन्ग रेंज मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्टचा (LRMP) आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. यामुळे अरबी समुद्रात भारतीय पाणबुड्यांना धोका वाढणार आहे. एडमिरल नवीद अशरफ यांनी पाकिस्तानी नौदलात लॉन्ग रेंज मेरीटाइम पेट्रोल एयरक्राफ्टचा समावेश केल्याची पुष्टी केली आहे. रणनितीक दृष्टीने पाकिस्तानचं हे महत्वाचं पाऊल आहे. समुद्री गस्ती विमान हे शत्रुच्या पाणबुड्या शोधून काढण्यासाठी कुठल्याही देशाच्या नौदलासाठी महत्वाचं साधन मानलं जातं. युद्धनौका विरोधी ऑपरेशनसाठी सुद्धा असं विमान मार्गदर्शक ठरतं.

एक इंटरव्यूमध्ये एडमिरल नवीद अशरफ यांनी लांब पल्ल्याच्या समुद्री गस्ती विमानांचा पाकिस्तानी नौदलात समावेश केल्याची घोषणा केली आहे. याला त्यांनी पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणाशी सुद्धा जोडलं. पाकिस्तानी नौदलाने आपल्या समुद्री गस्ती विमानांच्या प्रोजेक्टला ‘सी सुल्तान’ नाव दिलं आहे. पाकिस्तानी नौदलात फ्रिगेट, कार्वेट, पाणबुड्यांचा समावेश केला जात असल्याचही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय सायबर वॉरफेयर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि स्पेस इंटीग्रेशनला सुद्धा वेग दिला आहे. पाकिस्तानी नौदल टेहळणी, पाणबुडी विरोधी वॉरफेयर आणि आपल्या जलक्षेत्रापासून दूर ऑपरेशनची क्षमता वाढवण्यावर भर देत आहे.

पाकिस्तानने ‘सी सुल्तान’ प्रोजेक्ट का लॉन्च केलं?

भारतीय नौदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी नौदलाने ‘सी सुल्तान’ कार्यक्रम सुरु केला आहे. समुद्रातील भारतीय वर्चस्व कमी करणं आणि अरबी सागरात भारतीय पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. पाकिस्तानने ‘सी सुल्तान’ प्रोजेक्ट अंतर्गत ज्या समुद्री गस्ती विमानांचा समावेश केलाय त्यात एम्ब्रेयर लीनेज 1000E बिजनेस जेट विमानं आहेत. पाकिस्तानी नौदलाच्या अभियानासाठी खास पद्धतीने ही विमानं बनवण्यात आली आहेत.

पाकिस्तानकडे सी सुल्तान तशी भारताकडे काय क्षमता आहे?

भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात आपली समुद्री टेहळणी क्षमता अत्याधुनिक टेक्नोलॉजी, स्वदेशी युद्धनौका आणि अत्याधुनिक विमानांद्वारे मजबूत करत आहे.

भारतीय नौदल समुद्री टेहळणीसाठी P-8I पोसायडन विमानाचा वापर करते. बोइंग कंपनीने बनवलेलं हे विमान आहे. लांब पर्यंत नजर ठेवणं आणि खास पाणबुडी विरोधी युद्धासाठी हे विमान डिझाइन करण्यात आलं आहे.

त्याशिवाय भारतीय नौदलाकडे MH-60R ‘रोमियो’हेलिकॉप्टर सुद्धा आहेत. ही हेलिकॉप्टर्स खोल समुद्रातील शत्रुच्या पाणबुड्या शोधून ते नष्ट करण्यासाठी सक्षम आहे.

भारतीय नौदलाकडून पाणबुडी विरोधी जहाजं सुद्धा ऑपरेट केली जातात. यात आयएनएस माहे, आयएनएस अर्नाळा आणि आयएनएस आन्द्रोत सारख्या युद्धनौका आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा