AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US War Update : अरेरे, मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानसोबत इराणने हे काय केलं, अक्षरश: इज्जत निघाली

Iran US War Update : अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानात शांतता वार्ता होईल अशी स्थिती असताना इराणने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. यातून इराणचा पाकिस्तानवर किती विश्वास आहे ते दिसून आलं. पाकिस्तानने निश्चित यातून काही धडा घेतला पाहिजे.

Iran US War Update : अरेरे, मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानसोबत इराणने हे काय केलं, अक्षरश: इज्जत निघाली
pakistan pm Shehbaz Sharif
| Updated on: Mar 25, 2026 | 1:39 PM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. सध्या पाकिस्तान यात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन मिळालं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता घडवून आणण्यासाठी पाकिस्तान पडद्यामागून खूप प्रयत्न करतोय. कारण त्यांची स्वत:ची अर्थव्यवस्था कोसळायला आली आहे. या दरम्यान पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यावरुन मिडिल ईस्टमध्ये शांततेची स्क्रिप्ट लिहायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने मोठा झटका दिला आहे. इराणने खाडीमधून कराचीच्या दिशेने निघालेल्या सेलल जहाजाला होर्मुझमध्येच रोखलं आहे. त्यामुळे सेलन जहाजाला पुन्हा खाडीकडे वळावं लागलं आहे.

जहाजाला हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली नाही असं इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे हे जहाज पुन्हा माघारी फिरलं आहे. रिपोर्ट्नुसार हे जहाज संयुक्त अरब अमिरातवरुन पाकिस्तानच्या कराची बंदारच्या दिशेने चाललं होतं. पाकिस्तान सरकारने यावर मौन धारण केलं आहे. यूएईने सुद्धा काहीही टिप्पणी केलेली नाही.

या जहाजावर कशा प्रकारचं सामान होतं?

काबूल स्थित इराणी दूतावासाच्या स्टेटमेंटनुसार इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डच्य नेवीने पाकिस्तानच्या दिशेने निघालेल्या जहाजाला पुन्हा यूएईला पाठवून दिलं आहे. इराण सरकारने या जहाजाला हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली नाही. इक्वसिसनुसार हे छोटं फीडर कंटेनर जहाज आहे. 2000 साली ते बनवण्यात आलं होतं. यात जवळपास 6850 टन सामान वाहून नेता येतं. रिपोर्ट्नुसार या कंटेनरमध्ये शारजाहजवळ माल भरण्यात आला. ओमान मार्गे हॉर्मुझमधून हे जहाज जाणार होतं. जसा IRGC ने कंटेनर जहाजाला इशारा दिला, त्यांनी आपला मार्ग बदलला. या जहाजावर कशा प्रकारचं सामान होतं. त्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

वेळ चुकली

इराणने आतापर्यंत होर्मुझमधून पाकिस्तानच्या अनेक जहाजांना जावू दिलय. पण आता अचानक सेलर कंटेनर जहाजाला परत पाठवून दिलय. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेसाठी पाकिस्तानात बैठक प्रस्तावित असताना हे घडलय.

पाकिस्तानला हा झटका का आहे?

पाकिस्तानातील सत्ताधारी नेत्यांनी मागच्या 24 तासात इराणच्या बड्या नेत्यांसोबत कमीत कमी तीनवेळा चर्चा केली आहे. स्वत: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ इराणचे राष्ट्रपती मसूज पजेशकियन यांच्याशी बोलले आहेत. मात्र, तरीही पाकिस्तानी जहाजाचा मार्ग इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डने रोखला. ही कृती एकप्रकारे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देणारी आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक