AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War Update : फक्त तेल साठवल्यामुळेच नाही, तर या अन्य पाच कारणांमुळेही इराण संकटात भारत ठामपणे उभा

Iran War Update : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. कारण या युद्धाने थेट ऊर्जेवरच आघात केलाय. पण अन्य देशांच्या तुलनेत भारत या संकटकाळात ठामपणे उभा आहे. यामागे काही कारणं आहेत. ती जाणून घ्या.

Iran War Update : फक्त तेल साठवल्यामुळेच नाही, तर या अन्य पाच कारणांमुळेही इराण संकटात भारत ठामपणे उभा
Modi-Trump
| Updated on: Mar 25, 2026 | 1:06 PM
Share

मिडिल ईस्टमधील युद्धाने जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा धक्का दिला आहे. कच्चा तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या पार गेल्या आहेत. अनेक देश इंधन संकट, महागाई आणि पुरवठ्याच्या संकटाचा सामना करत आहेत. जागतिक तेल बाजारात अनिश्चिततेची स्थिती असताना भारतात मात्र वातावरण स्थिर आहे. देशाचं हित सर्वप्रथम. सरकार प्रत्येक स्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसेदत वक्तव्य केलं. भारताने आधीपासून मोठ्या प्रमाणात तेल साठवून ठेवलं आहे.

पीएम मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाजवळ लाखो टन तेल रणनितीक रिझर्व्हमध्ये आहे. त्यात सतत वाढ होत आहे. हा राखीव तेल साठाच देशाला अचानक पुरवठ्यात बाधा आली तर दिलासा देतो. सरकारी आकड्यांनुसार रणनितीक भंडार आणि ऑईल कंपन्यांचे स्टॉक्स मिळून भारताकडे जवळपास 70 पेक्षा अधिक दिवसांचा तेलसाठा बॅकअप आहे. पुरवठा बाधित झाला तर देशाकडे सावरायला वेळ आहे.

तेलसाठाच नाही भारताचा दुसरा बॅकअप प्लान काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसेदत सांगितलं की, एथेनॉल ब्लेंडिंगच्या माध्यमातून दर वर्षाला कोट्यवधि बॅरल तेलाची बचत होत आहे. यामुळे आयातीवरील दबाव कमी झाला आहे.

रेल्वेत वेगाने इलेक्ट्रिफिकेशन झाल्यामुळे डीझेलच्या मागणीत मोठी घट झाली आहे. ऊर्जेचा मोठा हिस्सा पर्यायी स्त्रोतातून येतोय. आज संकटकाळात ती मोठी मदत होतेय.

भारताची अपारंपारिक ऊर्जा क्षमता 250 गीगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. सोलार, विंड, हायड्रो आणि बायोगॅस सारख्या स्त्रोतांनी ऊर्जेचा पर्याय वाढवले आहेत. त्यामुळे तेलावरील अवलंबित्व कमी झालं.

सरकारने 15,000 इलेक्ट्रिक बस आणि मेट्रो नेटवर्कच्या विस्तारावर काम करत आहे. यामुळे इंधनाची गरज कमी होत चालली आहे. तेल आयातीवरील दबाव सुद्धा कमी आहे.

पीएम मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इंटर-मिनिस्ट्री ग्रुप रोज स्थितीची समीक्षा करत आहे. राज्यांना ब्लॅक मार्केटिंग रोखण्याचे सप्लाय कायम ठेवण्याचे आणि मजूर-गरीबांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. देशाकडे पर्याप्त प्रमाणात खाद्यान्न आणि कोळसा भंडार आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत