AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US War Update : युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांच्या 15 अटी, पाकिस्तान मार्फत प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचला पण..

Iran US War Update : मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तान सध्या मध्यस्थाच्या भूमिकेत आहे. त्यांच्या मार्फत अमेरिकेने आपला 15 अटींचा प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवला आहे. अमेरिकेने सध्या शांततेची भूमिका घेतली आहे. युद्ध संपवण्यासाठी पडद्यामागे चर्चा सुरु केल्या आहेत.

Iran US War Update : युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांच्या 15 अटी, पाकिस्तान मार्फत प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचला पण..
Trump-Sharif
| Updated on: Mar 25, 2026 | 12:02 PM
Share

इराण सोबत सुरु असलेलं युद्ध संपवण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर 15 सूत्री शांती प्रस्ताव ठेवला आहे. यात एक महिन्यासाठी सीजफायर, इराणचा अणवस्त्र कार्यक्रम मर्यादीत करणं, प्रॉक्सी ग्रुप्स (हमास, हिजबुल्लाह) या दहशतवादी गटांचं समर्थन बंद करणं आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा सुरु करण्याची मागणी अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात अमेरिका इराणवरील आंशिक प्रतिबंध हटवण्यास आणि UN च्या देखरेखीखाली नागरिक अणूऊर्जा कार्यक्रमाला मंजुरी देण्यास तयार आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, पाकिस्तानातील मध्यस्थामार्फत हा प्रस्ताव इराण पर्यंत पोहोचला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पोस्ट शेअर केली.

यात इस्लामाबाद दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या चर्चेत अमेरिकेकडून स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर सहभागी होऊ शकतात. इराणची सैन्य रचना आणि मिसाइल क्षमता संपवावी असंही या प्रस्तावात आहे. इराणने त्यांनी उभ्या केलेल्या दहशतवादी संघटनांच समर्थन बंद करावं अशी सुद्धा त्यात मागणी आहे.अणूऊर्जा सुविधा इराणच्या बाहेर असावी अशी सुद्धा अमेरिकेची मागणी आहे.

इराण या अटी मान्य करेल का?

इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुलं करावं अशी सुद्धा मागणी केली आहे. त्या बदल्यात अमेरिका प्रतिबंधातून आंशिक सवलत, संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली सिविलियन न्यूक्लियर प्रोग्राम आणि अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी आर्थिक मदत करायला तयार आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांनुसार या अटी इतक्या व्यापक आहेत की, कदाचितच इराण त्याचा स्वीकार करेल.

आणखी 3000 सैनिक पाठवले

अमेरिकेच्या अचानक सीजफायरच्या प्रस्तावामुळे इस्रायली अधिकारी हैराण झाले आहेत. हे युद्ध सुरु ठेवावं असं त्यांचं मत आहे. दुसरीकडे एकाबाजूला कूटनितीक प्रयत्न सुरु असताना पेंटागन या क्षेत्रात जवळपास 3000 अतिरिक्त सैनिक तैनात करत आहेत. सध्या मिडिल ईस्टमध्ये अमेरिकेचे जवळपास 50,000 सैनिक तैनात आहेत. सैन्य घडामोडी वाढल्या तर आखाती समुद्रात सुरुंग पेरु असा इराणने इशारा दिलाय.

तर ती इराणची एकप्रकारे हारच असेल

एक्सपर्ट्सनुसार हा 15 सूत्री कार्यक्रम अजिबात नवीन नाही. मे 2025 मध्ये सुद्धा असाच प्रस्ताव अमेरिकेने दिला होता. पण त्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणच्या अणवस्त्र आणि मिसाइल कार्यक्रमावर बंधन आणणं. युरेनियम साठा बाहेर पाठवणं हे आधीच्या सुद्धा प्रस्तावात होतं. इराणने या अटी मान्य केल्या तर त्यांची हारच आहे. इराणची अणू बॉम्ब बनवण्याची महत्वकांक्षा आणि बॅलेस्टिक मिसाइल्सची वाढत जाणारी रेंज या विरुद्धच अमेरिका-इस्रायलने हे युद्ध पुकारलय. त्यामुळे या अटी मान्य केल्या तर ती इराणची एकप्रकारे हारच असेल.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन