AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इराणने आम्हाला अनमोल गिफ्ट पाठवलं’, युरेनियमचा ताबा सोडला का? ट्रम्प यांच्या दाव्याने एकच खळबळ

Iran-US War Update : व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. इराणने आम्हाला एक मोठं अनमोल गिफ्ट पाठवलय असं ट्रम्प म्हणालेत. इराण-अमेरिका युद्धात सध्या पाच दिवसांचा पॉझ घेण्यात आला आहे.

‘इराणने आम्हाला अनमोल गिफ्ट पाठवलं’, युरेनियमचा ताबा सोडला का? ट्रम्प यांच्या दाव्याने एकच खळबळ
Donald Trump Image Credit source: Reuters
| Updated on: Mar 25, 2026 | 8:51 AM
Share

मिडिल ईस्ट मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळेच हैराण होतील असा दावा केला आहे. इराणने अमेरिकेला मोठं गिफ्ट दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित हे गिफ्ट आहे. त्यांनी या गिफ्टबद्दल पूर्ण माहिती दिलेली नाही. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली. “इराणने आम्हाला एक गिफ्ट दिलय. ते आजच आमच्याकडे पोहोचलं आहे. हे गिफ्ट खूप मोठं आणि भरपूर किंमती आहे. हे अणवस्त्राशी संबंधित नाही. तेल आणि गॅसशी संबंधित आहे. त्यांनी असं करुन खूप चांगलं काम केलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगातील एक महत्वाचा तेल मार्ग आहे. या जलमार्गावरुन जागतिक तेलाची जवळपास 20 टक्के वाहतूक होते. त्यामुळे हॉमुर्झ मध्ये होणार्‍या कोणत्याही घडामोडीचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होतो.

युद्धाला सुरुवात झाल्यापासून इराणने हा तेल मार्ग रोखून धरलाय. त्यामुळे अनेक देशात तेल संकट निर्माण झालं असून अस्थिरता वाढली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणने नाकाबंदी सारखी स्थिती करुन ठेवली आहे. अनेक देशांच्या जहाजांना लक्ष्य केलय. त्यामुळे तेल आणि गॅस भरलेली हजारो जहाजं समुद्रात अडकून पडली आहेत. जगभरात तेल आणि गॅसची टंचाई वाढू लागली आहे. जगात तेल आणि गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

इराण सोबतच्या डीलवर ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरु असल्याचा ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला. “इराण आता काही समजुतीच्या गोष्टी करतोय. तह करण्यासाठी तयार आहे. आमची अजूनही चर्चा सुरु आहे. इराणला सुद्धा डील हवी आहे. अमेरिकी अधिकारी तेहरानमधील योग्य लोकांच्या संपर्कात आहेत” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

कोणते नेते चर्चेचा भाग?

“जेडी वेन्स आणि मार्को रुबियो सारखे मोठे नेते या चर्चेचा भाग आहेत. इराणला आता हे युद्ध संपवायचं असून ते एक मोठा करार करण्याच्या जवळ आहेत” असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अमेरिकी प्रतिनिधी या आठवड्यात काही चर्चा करणार आहेत की नाही हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

ट्रम्प यांच्या जवळचा माणूस निराश

“अणवस्त्र बनवणार नाही हे इराणने मान्य केलय. तुम्ही अणवस्त्र बाळागायची नाही हे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलय आणि ते तयार आहेत” असा दावा ट्रम्प यांनी केला. “हे अभियान इतक्या लवकर कसं संपलं? त्यामुळे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ निराश आहेत. हा विषय इतक्या लवकर संपावा अशी त्यांची इच्छा नव्हती” असं ट्रम्प म्हणाले.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार