AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल इस्त्रायलने उचलले, रशिया आणि इराणला मोठा दणका, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका उठला आहे. शांतता कराराकरिता काही देश पुढे आले आहेत. यादरम्यानच आता इस्त्रायलकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. इस्त्रायलच्या या कारवाईने अत्यंत मोठी खळबळ उडाली.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल इस्त्रायलने उचलले, रशिया आणि इराणला मोठा दणका, थेट..
Iran-America War
| Updated on: Mar 25, 2026 | 8:04 AM
Share

चारही बाजूंनी मोठी नाचक्की झाल्यानंतर मोठा निर्णय घेत अमेरिकेने पाच दिवस हल्ले करणार नसल्याचे जाहीर करत म्हटले की, युद्ध पाच दिवसांकरिता थांबवत आहोत. यासोबतच इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मध्य पूर्वेत स्थिती अजूनही खतरनाक आहे. इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता काही अटी ठेवण्यात आल्यात. या अटी पूर्ण होत नाहीत तोवर इराण कोणतीही चर्चा करणार नाही आणि युद्ध थांबवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्याची मोठी धमकी इराणकडून देण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचलेले असताना इजिप्त शांतता करार करण्याकरिता पुढे आला. इजिप्तचे आखाती देशांसोबतच अमेरिका आणि इराणसोबत चांगले संबंध आहेत. मात्र, यादरम्यानच खळबळ उडवणारी घटना घडली आहे.

इस्रायलच्या निशाण्यावर कॅस्पियन समुद्र आहे. रशिया आणि इराण यांच्यातील एका महत्त्वाच्या शस्त्र पुरवठा मार्गाला टार्गेट करत मोठा हल्ला केला. इस्त्रायलने युद्धबंदी असताना हा हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. आम्ही फक्त एक सैन्य कारवाई नाही तर मोठा संदेश देण्याकरिता हा हल्ला केल्याचेही इस्त्रायलने म्हटले आहे. कॅस्पियन समुद्र जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा मानला जातो.

या मार्गाला एक सुरक्षित कॉरिडोर म्हणून रशिया आणि इराण वापर करतात. मात्र, तिथेच हल्ला इस्त्रालयकडून करण्यात आला. याच मार्गातून महत्वाचे हत्यार, बॉम्ब आणि सैन्याला लागणार महत्वाच्या गोष्टी याच मार्गाने इराण आणि रशिया देवाण घेणाव करतात. इराणचे शहीद ड्रोन हे या मार्गातील सर्वात मोठा दुवा होते. याच मार्गाने इराण रशियाला आपले शहीद ड्रोन पाठवत.

या युद्धात रशिया मोठ्या प्रमाणात इराणला मदत करत आहे. रशियाने इराणला सॅटेलाइट फोटो आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञान देखील पुरवले आहे, ज्यामुळे इराण अधिक घातक बनला. आता याच मार्गाला इस्त्रायलकडून टार्गेट करण्यात आले. अंजली बंदरला इस्त्रायलने निशाना बनवले. इस्रायलच्या नौदलाचे माजी कमांडर एलिझर मारुम यांच्या मते, या कारवाईचा मुख्य उद्देश रशियाची पुरवठा साखळी कमकुवत करणे हा आहे.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार