AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात हाहाकार! युएईची धमकी, थेट या देशातून त्या देशात भिकेचा कटोरा..

इराण आणि अमेरिका युद्धात लुडबुड करणाऱ्या पाकिस्तान संकटात आहे. फक्त जगापुढे दिखावेगिरी पाकिस्तानकडून केली जात आहे. पाकिस्तानमधील स्थिती भयंकर आहे. त्यामध्येच त्यांना युएईने मोठा झटका दिला. हेच नाही तर पाकिस्तानने केलेली विनंतीही त्यांनी ऐकली नाही.

पाकिस्तानात हाहाकार! युएईची धमकी, थेट या देशातून त्या देशात भिकेचा कटोरा..
Pakistan
| Updated on: Apr 16, 2026 | 12:57 PM
Share

पाकिस्तानात स्थिती नक्की काय आहे हे जगापासून वाचू शकले नाही. पाकिस्तानची मोठी वाट लागली आहे. फक्त जगापुढे दिखावा दाखवला जात आहे. देश चालवण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा उरला नाही. पण दुसऱ्या देशांमधील युद्ध थांबवण्याकरिता करोडो रूपये उडवली जात आहेत. एखाद्या देशाने दिलेले कर्ज परत मागितले तर दुसर्‍या देशाकडे भिकेचा कटोरा घेऊन पाकिस्तान जात आहे. युएईने पाकिस्तानला दिलेले कर्ज परत मागितले आहे. हेच नाही तर हा पैसा लवकर दिला नाही तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराच दिला. युएईच्या धमकीनंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर भिकेचा कटोरा घेत या देशातून त्या देशात जात आहेत. त्यांनी सुरूवातीला युएईसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, युएई दाद देत नसल्याचे लक्षात येताच पाकिस्तानने आपला मोर्चा इतरत्र वळवला.

पाकिस्तानचे पीएम शहबाज शरीफ कतार, सऊदी अरेबिया, तुर्कीकडे कर्ज मागण्यासाठी निघाले आहेत. पाकिस्तान सध्याच्या घडीला इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न करत आहे. युद्ध थांबवल्यानंतर आपल्याला इराण आणि अमेरिका कर्ज देईल, अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. त्याकरिताच पाकिस्तानची मरमर सुरू आहे.

IMF सारख्या वर्ल्ड बॅंकेकडून कर्ज मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. कतार, सऊदी आणि तुर्कीला पाकिस्तानने अगोदरच कर्ज मागितले आहे. पण एकही देश त्यांच्या मदतीकरिता पुढे येताना दिसत नाहीये. कोणत्याही स्थितीत शहबाज शरीफ यांना पैसा हवा आहे. सऊदीने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले की, 3 अरब डॉलर अतिरिक्त ते मदत करू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे.

पाकिस्तानने युएईला कर्ज फेड करण्याकरिता मुदत मागितली होती, पण युएईने स्पष्ट शब्दात नकार दिला. पाकिस्तानने आता चीनकडेही भीक मागण्यास सुरूवात केली. पण चीनने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. चीनने मदत नाकारली असली तरीही सऊदी पाकिस्तानला कर्ज देत आहे. पाकिस्तानला चीनने मदत नाकारल्याने त्यांना मोठा धक्का बसला. पाकिस्तानकडे सध्या 16 अरब डॉलर आहेत. मात्र, ते खर्च करू शकत नाहीत. याचे मोठे कारण IMF च्या अटीमुळे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...