AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारताला ललकारले, थेट पंतप्रधानांची दिली युद्धाची धमकी, सुट्टी नाहीच..

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी देण्यात आली. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच आता पाकिस्तानने भारताला थेट धमकी दिली.

पाकिस्तानने भारताला ललकारले, थेट पंतप्रधानांची दिली युद्धाची धमकी, सुट्टी नाहीच..
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif
| Updated on: Aug 14, 2026 | 8:16 AM
Share

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर निशाणा साधला. हेच नाही तर त्यांनी भारताला मोठा इशारा आणि धमकी दिली. इस्लामाबादमध्ये आयोजित यादगार ए फतह कार्यक्रमात बोलताना त्यांनी सिंधु जल कराराच्या मुद्द्यावर भारताला धमकी दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचा एक एक पाण्याचा थेंब रेड लाईन आहे. जर भारत मागे हटला नाही तर पाकिस्तान सरळ उत्तर देईल. युद्ध पेटू शकते. भारताने एप्रिल 2025 मध्ये भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधु जल करार स्थगित केला. ज्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला. भारताने पाकिस्तानी ठिकाणांना टार्गेट करत मोठे हल्ले केले. पीएम शहबाज शरीफ यांनी यादरम्यान असे काही शब्द बोलले ज्यानंतर जग त्यावर हसत आहे. जो देश दहशतवाद पसरवतो आणि दहशतवाद्यांना तयार करून पोसतो, त्याच देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, पाकिस्तान शांती, सन्मानसोबत उभा आहे.

शरीफ यांचे हे विधान हस्सास्पद आहे. पहलामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी मोठे हल्ले केले जात होते. स्थिती युद्धाची होती. शेवटी दोन्ही देशांनी करार करत युद्ध थांबवले. भारत आणि पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावा कायमच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी स्पष्ट केले की, दोन्ही देशांनी चर्चा करून हे युद्ध थांबवले आहे.

या भाषणावेळी शरीफ यांनी ट्रम्प यांच्याही नावाचा उल्लेख केला. ट्रम्प दावा करतात की, पाकिस्तान आणि भारतातील युद्ध मीच थांबले आणि हजारो लोकांचे जीव वाचवले. पाकिस्तानने चीनला आपला मित्र म्हटले असून वाईट काळात चीन कायमच आपल्या सोबत उभा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. एकीकडे शरीफ शांतीबद्दल बोलताना दिसले तर दुसरीकडे भारताला धमक्याही देताना दिसले.

सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर त्यांनी भारताला धमकी दिली. भारताकडून आता याला नक्की काय उत्तर दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तानने तुर्की, साैदी अरेबियासोबत संरक्षण करार केला. या कराराचा अर्थ असा की, तीनपैकी एका देशावर झालेला हल्ला तीन देशांवर समजला जाईल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?