AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

Karachi Stock Market Crash : इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटल्याने जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. मात्र सर्वाधिक पडझड पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंज मध्ये दिसून आली.

शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
Pak Market CrashImage Credit source: AI
| Updated on: Apr 13, 2026 | 6:01 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, पाकिस्तानात झालेल्या या चर्चेनंतर कोणताही करार झालेला नाही. या बातमीनंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. भारतातही सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये सुमारे दीड टक्क्यांची घसरण झाली. मात्र सर्वाधिक पडझड पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंज मध्ये दिसून आली. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली, त्यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आता आगामी काळातही पाकिस्तानच्या शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात बुधवारी केएसईमध्ये 12 हजारांहून अधिक अंकांची ऐतिहासिक वाढ झाली होती. कारण त्यावेळी डोनाल्ड ट्रंप यांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. कारण या युद्धविरामासाठी पाकिस्तान मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत होता, त्यामुळेच ही मोठी वाढ झाली. मात्र सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठी घसरण झाली. केएसईमध्ये व्यवहारादरम्यान 7 हजारांहून अधिक अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 160,158.92 अंकांपर्यंत खाली आला. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी केएसई 167,191.38 अंकांवर होता.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

पाकिस्तानी शेअर बाजारात झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 10 एप्रिल रोजी केएसई बंद होताना एकूण मार्केट कॅप 66.58 अब्ज डॉलर होती, जी व्यवहारादरम्यान कमी होऊन 63.78 अब्ज डॉलरवर आली. याचा अर्थ गुंतवणूकदारांना सुमारे 2.8 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी रुपयांत हे नुकसान 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाकिस्तानसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीतही घसरण

भारतीय शेअर बाजारात पाकिस्तानच्या तुलनेत कमी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 703 अंकांनी घसरून 76,847.57 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 207.95 अंकांनी घसरून 23,842.65 अंकांपर्यंत खाली आला. व्यवहारादरम्यान निफ्टीमध्ये जवळपास 500 अंकांची घसरण होऊन तो 23,555.60 अंकांपर्यंत खाली आला होता.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं