PM Narendra Modi : ज्याने इंडिया आऊटचा नारा दिला, त्याच नेत्यावर आता PM मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची वेळ

PM Narendra Modi : आजच्या भारताशी पंगा घेणं, नडणं अजिबात सोपं नाही. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानला त्यांची जागा कळली. अशाच एका नेत्याने इंडिया आऊटचा नारा दिला होता. आता त्याच्यावरच त्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी पीएम मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची वेळ आली आहे.

PM Narendra Modi : ज्याने इंडिया आऊटचा नारा दिला, त्याच नेत्यावर आता PM मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची वेळ
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2025 | 1:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. या दौऱ्यामुळे भारताची जागतिक रणनितीक स्थिती अजून बळकट होणार आहे. खासकरुन मालदीवमधून एक कूटनितीक संदेश जाईल. मिशन मालदीव म्हणून या दौऱ्याची आठवण ठेवली जाईल. खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या कार्यकाळात मालदीवचा दौरा करणारे पहिले परदेशी नेते बनणार आहेत. पीएम मोदी मालदीवच्या 60 व्या स्वतंत्रता दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

मालदीव आणि भारताची मैत्री दक्षिण आशियामधील सर्वात महत्त्वाची रणनितीक भागीदारी मानली जाते. दोन वर्षांपूर्वी दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू जबाबदार होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलं आहे.

Soft Diplomacy च यश

काहीजण याला भारतासाठी झटका म्हणत होते. काहीजण दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. पण या उलट झालं. पीएम मोदी यांनी कूटनिती आणि Soft Diplomacy च्या बळावर भारताच महत्त्व मालदीवच्या नव्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं. डॉ. मोइज्जु यांना सुद्धा समजलं की, चीनच्या तुलनेत भारत अधिक विश्वासू आणि संकट काळातील सच्चा भागीदार आहे.

भारताने मालदीवला काय दिलं?

आर्थिक सहाय्यात : भारताने 2024 साली मालदीवला 400 मिलियन डॉलरची आर्थिक मदत आणि 3,000 कोटी रुपयांची करन्सी स्वॅप सुविधा दिली.

डिफेन्स सहयोग : भारताने नौसैनिक उपकरण, ट्रेनिंग आणि विमान सेवा कायम ठेवली.

विकासात सहकार्य : 2025 मध्ये भारताने मालदीवसाठी MVR 100 मिलियन सहायता देऊन फेरी सेवेचा विस्तार केला.

राजकीय संवाद : जानेवरी आणि मे 2025 मध्ये नवी दिल्ली आणि मालेमध्ये High-Level Core Group (HLCG) ची बैठक झाली.

पंतप्रधान मोदींचा कितवा मालदीव दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा मालदीव दौरा आहे. मोदी 2018 साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर 2019 साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला. आता पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला चालले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा चीनसाठी एक संदेश असणार आहे. कारण चीन भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होता.